चांडोह येथे बिबट्या जेरबंद मांडवगण-फराटा येथे विहीरीत बिबट्या
शिक्रापूर:- शिरूर तालुक्यातील चांडोह येथील शेतकरी हर्षल भुजबळ यांच्या शेतात लावलेल्या पिंज-यात रविवारी पहाटे बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. सहा वर्षे वयाच्या बिबट मादीला माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात हलविण्यात आल्याचे वनविभागाच्या वनसंरक्षक आंधी पत्रकारांना सांगितले. दरम्यान,शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील ग्रामस्थांना एका विहीरीच्या कपारीत बिबट्या दिसून आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले.