• Total Visitor ( 351359 )
News photo

दापोलीत दुर्मीळ समुद्री कावळ्याला जीवदान

Raju tapal July 03, 2025 71

दापोलीत दुर्मीळ समुद्री कावळ्याला जीवदान;

भारतात दिसतो क्वचितच



दापोली :- दापोली तालुक्यातील मुर्डी समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी स्थानिकांना माेठा समुद्री कावळा (मुखवटाधारी बुबी) हा दुर्मीळ पक्षी आढळला. हा पक्षी प्रामुख्याने हिंद महासागर, प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागराच्या दुर्गम भागांत राहतो. या पक्षाला मनित बाईत, प्रतीक बाईत या दोघांनी जीवदान दिले आहे.



या पक्षाला मास्क्ड बुबी अर्थातच मुखवटाधारी बुबी किंवा मोठा समुद्री कावळा म्हणतात. आंजर्ले मुर्डी गावातील स्थानिक शेतकरी वैभव झगडे यांनी आपल्या शेतात या पक्ष्याला थकलेल्या अवस्थेत पाहिले. तो हालचाल करू शकत नव्हता, पंख पूर्णपणे ओले झालेले होते आणि तो अत्यंत कमकुवत दिसत होता. त्यांनी तातडीने ही माहिती दापोली वनविभागाला दिली.वनविभागाच्या समन्वयाने, वाईल्ड ॲनिमल रेस्क्युअर संस्थेचे प्रशिक्षित सदस्य मनीत आणि प्रतीक बाईत यांनी घटनास्थळी पोहोचून पक्ष्याची तपासणी केली.



पक्ष्याला सुरक्षितरीत्या उचलून प्राथमिक उपचार दिले गेले. हा पक्षी कोणत्याही साधारण प्रजातीचा नसून, समुद्राच्या दुर्गम भागात राहणाऱ्या दुर्मीळ प्रजातींपैकी एक आहे. भारतात तो वादळानंतर किंवा अन्नशोधाच्या कारणाने क्वचितच दिसतो. शनिवारी संध्याकाळी चार वाजता या पक्ष्याला आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षितरीत्या सोडण्यात आले. समुद्राच्या दिशेने पंख पसरताच, तेथील नागरिकांनी जल्लोष केला. या दुर्मीळ पक्ष्याला वाचवणाऱ्या नागरिकांचे आणि वनविभागाचे कौतुक होत आहे.

 


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement