• Total Visitor ( 430030 )
News photo

गोवेली क्रीडा संकुलात अवतरणार वारकऱ्यांचा महाकुंभ 

Raju tapal December 11, 2025 269

गोवेली क्रीडा संकुलात अवतरणार वारकऱ्यांचा महाकुंभ 

राजू टपाल. 

टिटवाळा :- कल्याण तालुक्यातील टिटवाळा नजीक असलेल्या गोवेली येथील क्रीडा संकुलात राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह धर्म जागरण महोत्सव ग्रंथराज श्री. ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण अखिल ठाणे जिल्हा वारकरी सांप्रदायच्या वतीने येत्या १६ डिसेंबर ते २३ डिसेंबर २०२५ पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. सदरील धर्म जागरण महोत्सव व ग्रंथराज श्री.ज्ञानेश्वरीचे भव्य सामुदायिक पारायण महोत्सवाचे स्वागताध्यक्ष माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे असणार आहेत. सदरील कार्यक्रमास बालयोगी श्री.सदानंद महाराज तुंगारेश्वर व शांतीब्रम्ह श्री.गुरु मारुतीबाबा कुऱ्हेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सदरील कार्यक्रमास स्वा.सुखनिवासी श्रीगुरु जोग महाराज,स्वा.सुखनिवासी श्रीगुरु वामनबाबा, स्वा.सुखनिवासी श्रीगुरु सावळाराम महाराज,ब्रह्मलीन योगी प.पू.रिद्दीनाथ बाबा,स्वा.सुखनिवासी गु.शंकर महाराज शहाडकर यांचे शुभाशीर्वाद लाभलेले आहेत. सदरील कार्यक्रमास मंडळ अध्यक्ष म्हणून ह.भ.प.श्री.माधव महाराज केशव हे असणार आहेत तसेच प्रेरणा तथा प्रमुख मार्गदर्शन रामायणाचार्य  ह.भ.प. श्री.विश्वनाथ महाराज वारिंगे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच मंगळवार दिनांक २३ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १२ काल्याचे कीर्तन ह.भ.प.गुरुवर्य  श्री.केशव महाराज उखळीकर यांच्या कीर्तनाने सांगता होणार आहे. तरी परिसरातील सर्व वारकरी मंडळींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहे. 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement