महात्मा फुलेंनी अपमानात अस्मिता शोधली; प्रा.संतोष वीरकर
महात्मा फुलेंनी अपमानात अस्मिता शोधली असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर येथील प्रा.संतोष वीरकर यांनी शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे केले.
ख्यातनाम विचारवंत, सामाजिक विषयांचे अभ्यासक डॉ.हरी नरके यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले विचार मंचाच्या वतीने तळेगाव ढमढेरे येथील संत सावता महाराज मंगल कार्यालयात प्रा.वीरकर यांचे महात्मा फुले चरित्र,समग्र साहित्य या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. शैक्षणिक कार्यातील विशेष योगदानाबद्दल सत्यशोधक डाॅ.हरी नरके पुरस्कार तळेगाव ढमढेरे येथील प्रा.आशुतोष विलासराव ढमढेरे सर, प्रा.कावेरी आशुतोष ढमढेरे यांना क्रांती सूर्य महात्मा फुले विचार मंचाच्या वतीने यावेळी देण्यात आला.
तळेगाव ढमढेरे गावच्या सरपंच स्वातीताई लांडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या व्याख्यानास शिक्रापूर गावच्या उपसरपंच वंदनाताई भुजबळ, तळेगाव ढमढेरे गावच्या उपसरपंच किर्तीताई गायकवाड, बाजार समितीचे माजी सभापती अरविंददादा ढमढेरे,पंचायत समितीचे माजी सदस्य आबासाहेब गव्हाणे,समता परिषदेचे राज्य संघटक सोमनाथ भुजबळ,माळी महासंघाचे प्रवक्ते संजय जकाते, भैरवनाथ ट्रस्टचे संचालक, पाटोदा शहराचे तहसीलदार विजय बनसोडे, सेवानिवृत्त तलाठी कैलासदादा नरके, डाॅ.चंद्रकांत केदारी,पंचायत समितीचे सेवानिवृत्त लेखाधिकारी सुरेंद्र सातपुते,कृष्णाजी ढमढेरे, चेतना ढमढेरे,सामाजिक कार्यकर्ते सुनीलराव ढमढेरे,आदींसह राजकीय सामाजिक शैक्षणिक व्यापार क्षेत्रातील प्रमुखांसह विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी व्याख्यानास उपस्थित होते.
बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे खरं सा़ंगत असताना कोणाच्या बापाला घाबरायचे नाही ते प्रबोधन असे सांगून व्याख्यानात पुढे बोलताना प्रा.संतोष वीरकर म्हणाले, एखाद्या महापुरूषाच्या आयुष्यात एखादी घटना घडते आणि तिथून ख-या अर्थाने परिवर्तन होते.शाळा कोणी काढली? शिक्षकदिन कोणाच्या नावाने साजरा करतात? असे सवाल उपस्थितांना करून प्रा.वीरकर म्हणाले, महात्मा फुले स्वत; शिकले, सावित्रीबाई फुलेंना शिकविले.डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी कोणाला शिकविले? सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी एखादी शाळा काढली का? विद्यालय काढले का? आपल्या आई,बहिणीला शिकविले का? नाहीये .सर्वपल्ली राधाकृष्णन एखाद्या विशिष्ट जातीत जन्माला आले म्हणून त्यांच्या नावाने शिक्षकदिन साजरा केला जातो.
प्रतिनिधी:- विजय ढमढेरे शिक्रापूर