मेजर ध्यानचंद राष्ट्रीय "क्रिडा रत्न" पुरस्काराने पै.झेंडू पवार सन्मानित
शिक्रापूर (प्रतिनिधी) :- क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील बबईताई टाकळकर आश्रमशाळेचे मुख्याध्यापक पै.झेंडू पवार यांना सन्मानित करण्यात आले.
क्रिडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षक, मार्गदर्शक, खेळाडू यांना मिशन ऑलिंपिक गेम्स असोसिएशन इंडिया,दिल्ली पॅरामेडिकल बोर्ड (गव्हर्मेंट ऑफ दिल्ली) यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रिडा रत्न पुरस्कार दिला जातो.
दि.२९ऑगस्ट २०२५ रोजी राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त अण्णापुर गावचे सुपुत्र,असंख्य क्रीडा खेळाडूंचे मार्गदर्शक,प्रशिक्षक. गुरुवर्य झेंडू पवार,मुख्याध्यापक टाकळकर आश्रम शाळा तथा पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पै.झेंडू पवार यांना क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मिशन ऑलिंपिक गेम्स असोसिएशन इंडिया व दिल्ली पॅरामेडिकल बोर्ड गव्हर्मेंट ऑफ दिल्ली यांचे वतीने मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल इतर मागास बहुजन कल्याण विभाग पुणे यांचे वतीने पहिल्याच भटक्या विमुक्त दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात पैलवान झेंडू पवार सरांना सहा.संचालक संतोषजी हराळे,प्रादेशिक उप संचालक खुशालजी गायकवाड, गायकवाड,सहा.संचालक प्रदीप संकपाळ,माजी संचालक शिक्षण विभाग पवार,साहित्यिक लेखक भरत विटकर या मान्यवरांच्या हस्ते सन्मानाचिन्ह प्रदान करण्यात आले.
अथक परिश्रम,जिद्द,कष्टाळूपणा ग्रामीण भागातील लाल मातीतील खेळाडू घडविण्याची अविरत धडपड यामुळे शिरूर तालुक्याला असंख्य मल्ल कुस्ती क्षेत्रात नावाजत आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य खेळाडू यशाची शिखरे पार करत त्यांनी राज्य, राष्ट्रीय पातळीवर अनेक पदके मिळविली असून त्यांचे मार्गदर्शन प्रेरणादायी वारसा हीच त्यांच्या यशाचे गमक आहे. त्यांच्या कार्याची दखल म्हणून त्यांना क्रिडा रत्न पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले.
त्यांना पुरस्कार प्राप्त होताच श्री. म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, माजी आमदार सूर्यकांत पलांडे शिरूरसह पुणे जिल्ह्यातील असंख्य खेळाडू मल्ल, क्रिडा शिक्षक, निमगाव म्हाळुंगीतील ग्रामस्थांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.