• Total Visitor ( 701540 )
News photo

माळशेज माहामार्ग पोलिसांची पेट्रोलिंग बंद

Raju tapal June 26, 2025 202

माळशेज माहामार्ग पोलिसांची पेट्रोलिंग बंद,



पोलिस वाहनांची नासधुस झाल्याने माळशेज घाटाची सुरक्षा रामभरोसे!



माळशेज घाटातील आवळेची वाडी येथे दुचाकी व चारचाकी वाहनांमध्ये अपघात झाला होता,त्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता घटनास्थळी राष्ट्रीय महामार्ग पोलिस माळशेज घाट येथील पोलिस हजर होते.मात्र तेथील जमावाचा उद्रेक होऊन माहामार्ग पोलिसांच्या दोन्ही वाहनांची जमावाकडून नासधुस करण्यात आली.काही पोलिस देखील गंभीर जखमी झाले असून आता पावळ्यात माळशेज घाटात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात,आणि घाटात अनेक ठिकाणी अपघात होत असतात,तसेच वाहतूक कोंडी देखील होते, परिणामी या घाटात माहामार्ग पोलिस नसल्याने किंवा पेट्रोलिंग करणा-या त्यांच्या गाड्या नसल्याने वाहन चालकांना वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे.तरी येथील माहामार्ग विभागाची सुरक्षा पुन्हा सुरू व्हावी अशी मागणी वाहन चालक करत आहेत.

राजेश भांगे मुरबाड

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026