• Total Visitor ( 427953 )
News photo

मांडवगण फराटा येथील विद्यालयाचा विज्ञान व वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के

Raju tapal May 06, 2025 72

मांडवगण फराटा येथील विद्यालयाचा विज्ञान व वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के



शिरूर :- मा़ंडवगण फराटा येथील श्री.वाघेश्वर विद्याधाम, कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी परिक्षेचा विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे.

विज्ञान शाखेचे ९७ विद्यार्थी परिक्षेस बसले होते. ९७ ही विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे.

विज्ञान शाखेतील चांदगुडे गौरी संजय या विद्यार्थिनीने ३९३ गुण (शेकडा ६५.५० टक्के गुण) मिळवून विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक मिळविला.

कुतवळ ईश्वरी सतिश या विद्यार्थिनीने ३९२ गुण (६५.३३ टक्के गुण) मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला.

खरात प्रतिक अंकूश या विद्यार्थ्याने ३८४ गुण  (६४ टक्के गुण) मिळवून विज्ञान शाखेत तृतीय क्रमांक मिळविला.

वाणिज्य शाखेतील ४६ विद्यार्थी परिक्षेस बसले होते. परिक्षेस बसलेले ४६ ही विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने वाणिज्य शाखेचाही निकाल १०० टक्के लागला आहे.

शेळके पूर्वी दिलीप या विद्यार्थिनीने ५३१ गुण (८८.५० टक्के गुण) मिळवून वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक मिळविला.

पवार दिव्या शरद या विद्यार्थिनीने ५२१ गुण (८६.८३ टक्के गुण) मिळवून वाणिज्य शाखेत द्वितीय क्रमांक मिळविला.

काकडे प्रिती प्रकाश या विद्यार्थिनीने ५१० गुण (८५ टक्के गुण) मिळवून वाणिज्य शाखेत तृतीय क्रमांक मिळविला.

कला शाखेतील ३६ विद्यार्थी परिक्षेस बसले होते. एकूण ३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने कला शाखेचा निकाल ८६.११ टक्के लागला आहे.

घाडगे ऋतूजा प्रवीण या विद्यार्थिनीने ४६० गुण (७६.६७ टक्के गुण) मिळवून कला शाखेत प्रथम क्रमांक मिळविला.

दिवटे अर्पिता बाळू या विद्यार्थिनीने ३८९ गुण (६४.८३ टक्के गुण ) मिळवून कला शाखेत द्वितीय क्रमांक मिळविला.

डिंबळे ध्रुव संदीप या विद्यार्थ्याने ३५५ गुण (५९.१७ टक्के गुण) मिळवून कला शाखेत तृतीय क्रमांक मिळविला.

उत्तीर्ण झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयातील शिक्षक तसेच मांडवगण फराटा ग्रामस्थांनी अभिनंदन केले.



प्रतिनिधी :- विजय ढमढेरे (कोंढापुरी ता‌.शिरूर जि.पुणे)

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement