• Total Visitor ( 485238 )
News photo

भरधाव वेगाने जाणा-या अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या गवंडी कामगाराचा मृत्यू 

Raju tapal November 10, 2025 63

भरधाव वेगाने जाणा-या अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या गवंडी कामगाराचा मृत्यू 

       

शिक्रापूर (प्रतिनिधी):- भरधाव वेगाने जाणा-या अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या गवंडी कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना लोणी काळभोर येथे घडली.

काम भेटते का बघून येतो असे सांगून शिवाजी वैरागे‌ घराबाहेर पडले होते.पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने वैरागे‌ पायी चालत असताना त्यांना पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक दिल्याने शिवाजी वैरागे गंभीर जखमी झाले होते. पुढील उपचारासाठी शिवाजी वैरागे‌ यांना ससून रुग्णालयात दाखल केले  होते.उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विजय वैरागे‌ यांनी अपघाता संबंधी फिर्याद लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये दिली. पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद जगताप या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

        


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement