निमगाव म्हाळुंगी येथे शिवभक्तांचा सामुहिक गंगापूजन सोहळा
शिक्रापूर ( प्रतिनिधी) :- विमानाने काशी यात्रेला गेलेल्या शिव भक्तांचा सामूहिक गंगापूजन सोहळा शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. माजी सरपंच बापूसाहेब काळे यांच्या संकल्पनेतून निमगाव म्हाळुंगी येथील १६० शिवभक्त विमानाने मुंबई ते काशी असा विमानप्रवास करून पुढे अयोध्या, प्रयाग राज, चित्र कुट तिर्थक्षेत्र यात्रा दर्शनासाठी गेले होते. सर्व तीर्थक्षेत्र करून आल्या नंतर निमगाव म्हाळुंगी येथे गावात सामूहिक गंगापुजन सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला
सकाळी गंगापुजन, नंतर मिरवणूक ढोलताशांच्या गजरात लेझीमपथकाच्या तालावर शिव भक्तांची जंगी मिरवणूक काढून शिव भक्तांवर रंगीबेरंगी फुलांची उधळण करण्यात आली होती. यावेळी जय श्रीराम च्या घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला होता. मिरवणुकीनंतर मान्यवरांचा सत्कार समारंभ तसेच मनोगत पार पडले. यामध्ये बिग बॉसफेम अभिजित बिचुकले यांची प्रमुख उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. तीर्थयात्रेचे आयोजकमाजी सरपंच बापूसाहेब काळे यांनी प्रास्ताविक केले.
भाजपा शिरूर तालुका अध्यक्ष जयेशदादा शिंदे, आमदार माऊलीआबा कटके यांचे बंधू अनंता कटके,बिगबॉस फेम अभिजित बिचुकले, भाजपा किसान मोर्चा पुणे जिल्हा सरचिटणीस शरद रासकर, निमगाव म्हाळुंगी चे माजी सरपंच रावसाहेब चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. ह.भ.प.वारकरीरत्न चैतन्य महाराज नाशिककर यांनी भक्तिमय वातावरणात कीर्तनरूपी सेवा सादर केली व शेवटी महाप्रसादा नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
तीर्थयात्रेचे सहआयोजक प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.गजानन महाराज इंगोले,बाळासाहेब चव्हाण,दिलीप चव्हाण,नामदेव काळे,दिलीप विधाटे,अंकुश नाणेकर,पोपट भागवत,त्रंबकराव चव्हाण,हभप माऊली महाराज पजई,कुंडलिक महाराज मीरासे, शुक्राचार्य महाराज अवचार,सामाजिक कार्यकर्ते परशुराम भाडळे,म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक बबनराव रणदिवे,रायचंद गव्हाणे,पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निवृत्त अधिकारी प्रभाकर लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य विक्रम चव्हाण,कोमलताई चव्हाण सी आर फी एफ जवान,शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा गावडे, दादा पवार,बापू गावडे,संतोष पाटील,कांतीलाल चव्हाण, दादाभाऊ काळे,अंगणवाडी जेष्ठ सेविका तथा सामाजिक कार्यकर्त्या रंजना चव्हाण, पद्मा थोरात,पार्वतीबाई भागवत,वैशाली चव्हाण,आशाताई धनवते,शारदा गुंजाळ,आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक नामदेव भोरडे यांनी केले. निमगाव म्हाळुंगी गावचे आदर्श सरपंच राजेंद्र विधाटे यांनी आभार मानले.
प्रतिनिधी:- विजय ढमढेरे (कोंढापुरी ता.शिरूर)