• Total Visitor ( 758515 )
News photo

मीरा रोडमध्ये स्पा सेंटरवर MBVV क्राइम ब्रांचचा छापा...

Raju Tapal publisher November 02, 2026 18

मीरा रोडमध्ये स्पा सेंटरवर MBVV क्राइम ब्रांचचा छापा...



डिव्हाईन स्पा सेंटरमधून पाच तरुणींची सुटका,मॅनेजरला अटक,मालक-चालक फरार...



राजू टपाल.



मीरा रोड :- मीरा रोड पूर्व परिसरातील डिव्हाईन स्पा सेंटरमध्ये मीरा-भाईंदर, वसई-विरार (MBVV) पोलिसांच्या क्राइम ब्रांच पथकाने धडक कारवाई करत छापा टाकला. या कारवाईत स्पा सेंटरच्या एका मॅनेजरला अटक करण्यात आली असून,कथित वेश्याव्यवसायातून पाच तरुणींची सुटका करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,डिव्हाईन स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याच्या संशयावरून क्राइम ब्रांचच्या पथकाने ही कारवाई केली. छाप्यादरम्यान पाच तरुणींची सुटका करण्यात आली, तर स्पा सेंटरच्या मॅनेजरला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.दरम्यान,या स्पा सेंटरचे चालक-मालक कारवाईची चाहूल लागताच फरार झाल्याची माहिती आहे.त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू असल्याचे समजते.

या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून,या व्यवसायामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.मीरा रोड परिसरातील या कारवाईमुळे अवैध व्यवसाय चालवणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement