महिला समाजभूषण पुरस्काराने मनिषा रमेश गडदे सन्मानित
शिक्रापूर:- शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील कर्तव्य फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा मनिषा रमेशराव गडदे यांना सरपंच सेवा संघाच्या वतीने राज्यस्तरीय महिला समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने माऊली संकुल सभागृह सावेडी रोड अहिल्यानगर येथे राज्यस्तरीय सन्मान सोहळा नुकताच संपन्न झाला.यावेळी शिक्रापूर येथील कर्तव्य फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा मनिषा रमेशराव गडदे यांना सन्मानित करण्यात आले. सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष निलेश कुमार पावसे,महंत डॉ.श्रीकांतदास धुमाळ उज्जैन महाकाल,डॉ.सुधा कांकरिया,डॉक्टर शंकर अंदानी, सिनेतारका रुचिरा देसाई,शिक्रापूर ग्रामपंचायतीचे सरपंच रमेशराव गडदे,सदस्य त्रिनयन कळमकर,प्रकाश वाबळे,अंकुश घारे,ग्रंथपाल संतोष काळे,भरत खोले,महेश शिर्के,संकेत गडदे,हार्दिक गडदे,मेघा तांबे,वंदना रामगुडे,वैशाली गायकवाड,कल्याणी गडदे,सीमा कळमकर यावेळी उपस्थित होते. शिक्रापूर गावामध्ये व परिसरामध्ये कर्तव्य फाऊंडेशनच्या वतीने प्रामुख्याने आरोग्य शिबिरे,रक्तदान शिबिर,नेत्र तपासणी शिबिर,शालेय विद्यार्थ्यांना प्रश्नसंच वाटप,वह्यावाटप,वृक्ष लागवड,स्वच्छता मोहीम,बचत गटांना ट्रेनिंग अनाथ आश्रम शाळेला मदत,दिव्यांगांना मदत,ऊसतोड कामगारांना दिवाळी फराळ वाटप,सार्वजनिक ठिकाणी कॅमेरे,सालाबाद प्रमाणे एक जानेवारी येथे आलेल्या भीम अनुयायांना अल्पोहार,चहा,पाणी वाटप इत्यादी सामाजिक बांधिलकी जपत हे उपक्रम राबविल्याबद्दल तसेच केलेल्या कामांबद्दल स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सौ.मनिषा रमेशराव गडदे यांना राज्यस्तरीय महिला समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.