• Total Visitor ( 430222 )
News photo

जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्काराने मुकूंदराव ढोकले‌ सन्मानित

Raju tapal September 29, 2025 129

जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्काराने मुकूंदराव ढोकले‌ सन्मानित      



शिक्रापूर (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ, नगरसेवक संतोषभाऊ भेगडे फाऊंडेशन तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२५ निमगाव म्हाळुंगी ता‌.शिरूर येथील विद्या विकास मंदीर विद्यालयातील शिक्षक मुकूंदराव रामचंद्र ढोकले यांना सन्मानपूर्वक, समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, तळेगाव दाभाडे येथील संतोषभाऊ भेगडे फाऊंडेशनचे अध्यक्ष, नगरसेवक संतोषभाऊ भेगडे यांच्या हस्ते रविवार दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता तळेगाव दाभाडे ता.मावळ येथील सुशिला मंगल कार्यालयात हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास नगरसेवक संतोषभाऊ भेगडे,मावळ तालुका महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष राम कदमबांडे, पुणे जिल्हाध्यक्ष निलेश काशिद, सचिव महेश शेलार, मुख्याध्यापक संघाचे शिरूर तालुकाध्यक्ष रामदास थिटे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुणवंत शिक्षक पुरस्कार मुकूंदराव ढोकले यांना प्रदान करण्यात आला.

निमगाव म्हाळुंगी येथील विद्या विकास मंदीर माध्यमिक,उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक मुकूंदराव ढोकले‌ यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव व्हावा म्हणून हा पुरस्कार ढोकले यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला आहे.

     


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement