• Total Visitor ( 497529 )
News photo

मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्याला एसीबीकडून अटक

Raju Tapal publisher April 26, 2026 16

मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्याला एसीबीकडून अटक



मुंबई पालिकेच्या एफ नॉर्थ विभागातील अधिकाऱ्याला एसीबीकडून अटक करण्यात आली आहे. नवी मुंबईनंतर आता मुंबई महानगर पालिकेतील अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. विशाल भालचंद्र वाणी असे आरोपी अधिकाऱ्याचे नाव आहे. हा अधिकारी एफ नॉर्थ विभागात दुय्यम अभियंता म्हणून कार्यरत आहे. बांधकाम साईटसाठी जल निष्कासन परवानगीसाठी १० लाखांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर या अधिकाऱ्याला सापळा रचून एसीबीने कारवाई केली. अडीच लाख रुपये ॥ स्वीकारताना रंगेहाथ पकडलं. संबंधित अधिकारी प्रजन्य जल वाहिनी विभागात कार्यरत आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement