• Total Visitor ( 703874 )
News photo

महापालिका आयुक्त अभिनव गोयल सह अधिकाराऱ्यानी केली नालेसफाईची पाहणी

Raju tapal April 22, 2025 117

महापालिका आयुक्त अभिनव गोयल सह अधिकाराऱ्यानी केली नालेसफाईची पाहणी



कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल सह महापालिका अधिकारी यांनी कल्याण शहरातील मुख्य नाल्याची पाहणी करून संबंधित अधिकारी यांना नालेसफाईची कामे युद्ध पातळीवर करा असे आदेश महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिले आहेत. यावेळी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त अतुल पाटील, उपायुक्त संजय जाधव, प्रसाद बोरकर, कार्यकारी अंभियता,शहर अभियंता,अ प्रभाग सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील,उपस्थित होते.

काही दिवसात मानसुनचे आगमन होणार आहे त्यापुर्वी कल्याण डोंबिवली शहरातील नालेसफाईची कामे होणे गरजेचे आहे यासाठी 21 एप्रिल रोजी महापालिका प्रशासना कडून नालेसफाई दौरा आयोजित करण्यात आला होता.

नालेसफाईची दौरा सुरुवात मोहने येथून करण्यात आली. उल्हास नदिपात्रातील जलपर्णी मोठ्या प्रमाणात होती. परंतु ती आता काढण्यास सुरुवात केली आहे त्याची पाहणी केली. तसेच मोहने व गाळेगाव येथील नळा पाहणी,तसेच मोहने येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळयाच्या बाजुला आसलेल्या सौचालयाची पाहणी केली व काम कशामुळे थांबले आहे याची माहिती अधिकारी यांच्या कडुन घेतली, तसेच उल्हास नदी बंधारा व शहाड येथील अंबिका नगर जवळील नाले सफाई पाहणी,अनुपम नगर, चिकनकर, स्टेशन रोड,सांगळेवाडी जवळील नाले आदि नाल्याची पाहणी करून संबंधित अधिकारी यांना साफसफाईचे आदेश देण्यात आले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026