• Total Visitor ( 701867 )
News photo

महापालिका आयुक्त यांनी vc द्वारे घेतला रस्ते दुरुस्तीचा आढावा!

Raju tapal August 23, 2025 97

महापालिका आयुक्त यांनी vc द्वारे घेतला रस्ते दुरुस्तीचा आढावा!

कोणाचीही खैर केली जाणार नाही

आयुक्त यांचा सक्त इशारा



महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आज VC द्वारे सर्व प्रभागातील अभियंते व ठेकेदार यांची  बैठक घेतली आणि कल्याण डोंबिवली परिक्षेत्रात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्ती आणि खड्डे भरणीच्या कामाचा प्रभाग निहाय आढावा घेतला.

येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुढील पाच दिवसात जास्तीत जास्त मशिनरी आणि मनुष्यबळ वापरून रस्ते दुरुस्ती करावी, दिवसभर  व रात्री या दोन्ही सत्रात काम करावे तसेच जास्त वाहतुकीचे,वर्दळीच्या ठिकाणी रात्रीचे वेळी काम करावे असे निर्देश त्यांनी सर्व प्रभागातील अभियंते आणि ठेकेदार यांना दिले.



रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एखादी आपत्ती घडल्यास संबंधित ठेकेदारास ब्लॅक लिस्ट केले जाईल असाही इशारा त्यांनी या बैठकीचे वेळी दिला.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026