• Total Visitor ( 701794 )
News photo

शिरूरमध्ये युवकाचा खून

Raju tapal October 09, 2025 150

शिरूरमध्ये युवकाचा खून



शिक्रापूर (प्रतिनिधी) :- शिरूर बायपास रस्त्यावरील बाफना मळ्यालगत २१ वर्षीय युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे.

संतोष मारूती ढोबळे वय -२१ वर्षे  सध्या राहणार वाडा काॅलनी शिरूर मूळ रा‌.आसोला ढोपळा ता‌.औंढा नागनाथ जि.हिंगोली असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. ८ आॅक्टोबर रोजी शिरूर शहराबाहेरून जाणा-या पुणे -अहिल्यानगर बायपास रस्त्यावर बाफना मळ्यालगत संतोष मारूती ढोबळे वय २१ वर्षे या युवकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे शिरूर पोलीसांनी पत्रकारांना सांगितले.ढोबळे कुटूंबिय मागील १५ वर्षांपासून शिरूर येथे स्थायिक असून त्यांचा टेम्पोचा व्यवसाय आहे. सदर खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य संशयित इसमाचा शोध सुरू असून त्याचा मागोवा घेण्यासाठी विशेष पथक रवाना केले आहे असे पोलिसांनी पत्रकारांना सांगितले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026