• Total Visitor ( 581246 )
News photo

नाशिकमधील भोंदूबाबा स्वयंघोषित कँप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक

raju tapal March 19, 2026 130

नाशिकमधील भोंदूबाबा स्वयंघोषित कँप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक. 



 



पोलीसांकडून ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त; नाशिकसह राज्यात उडाली खळबळ



स्त्रीयांचे शोषण करणारा अशोक खरातला पोलीसांनी केले गजाआड



आता महिला आयोग याबाबतीत झोपेचं सोंग करणार, की याबतीत कारवाई करणार?



नाशिक:-नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बलात्कार प्रकरणात नाशिक पोलिसांनी एका स्वयंघोषित कॅप्टन आणि ज्योतिषाला अटक केली आहे. अशोक खरात असं या ज्योतिषाचे नाव आहे. नाशिक पोलिसाच्या क्राइम ब्रांच-१ युनिटने बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यामध्ये त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे नाशिकसह राज्यात खळबळ उडाली आहे. एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात या अशोक खरातवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या अटकेमुळे नाशिकमधील भोंदूगिरी आणि शोषणाचे एक मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement