• Total Visitor ( 516089 )
News photo

आता शिक्षक गप्प बसणार नाहीत - प्रा. प्रमोद वाघमोडे 

Raju Tapal publisher May 17, 2026 13

आता शिक्षक गप्प बसणार नाहीत - प्रा. प्रमोद वाघमोडे 



महाराष्ट्र राज्य शिक्षणव्रती शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघाची स्थापना 



मुंबई:- अनेक दशकांपासून खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा,विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आता राज्यभरातून आवाज उठू लागला आहे.अत्यल्प वेतन,अस्थिर सेवा,मानसिक दबाव आणि मान-सन्मानाचा अभाव यामुळे त्रस्त झालेल्या शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रा.प्रमोद वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली “महाराष्ट्र राज्य शिक्षणव्रती शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघ” या नव्या व्यापक संघटनेची उभारणी वेगाने सुरू झाली असून,शिक्षण क्षेत्रात परिवर्तनाची एक नवी चळवळ उभी राहत आहे.शिक्षकांचे शोषण आणि असुरक्षिततेचे सावट सध्या शिक्षण क्षेत्रात,विशेषतः खाजगी आणि स्वयंअर्थसहाय्यित संस्थांमध्ये शिक्षकांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. शासनाचे नियम आणि कायदे समान असतानाही अनेक संस्थाचालक ते धाब्यावर बसवून शिक्षकांच्या हक्कांवर गदा आणत आहेत. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सेवा बजावणाऱ्या महिला शिक्षिकांना तर “जे मिळेल त्या वेतनात काम करा,अन्यथा नोकरी सोडा” अशा अन्यायकारक अटी-शर्तींचा आणि मानसिक दबावाचा सामना करावा लागत आहे. या शोषणाविरुद्ध आता शिक्षक संघटित होऊ लागले आहेत.बालवाडी ते महाविद्यालयापर्यंत सक्षम व्यासपीठ या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी 'महाराष्ट्र राज्य शिक्षणव्रती शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघ' हे एक सक्षम आणि संघर्षशील व्यासपीठ म्हणून पुढे आले आहे. ही केवळ एक संघटना नसून शिक्षकांच्या स्वाभिमानाचा आवाज आणि शिक्षण क्षेत्रात न्याय,सन्मान व सुरक्षिततेसाठी सुरू झालेला संघर्ष आहे,असे मत संस्थापक प्रा. प्रमोद वाघमोडे यांनी व्यक्त केले आहे. या व्यासपीठामध्ये बालवाडीपासून ते महाविद्यालयापर्यंतचे शिक्षक,प्राध्यापक,कार्यालयीन कर्मचारी, प्रयोगशाळा कर्मचारी आणि शिपाई अशा शिक्षण क्षेत्राशी संबंधित प्रत्येक घटकाच्या प्रश्नांना न्याय दिला जाणार आहे.संघटनेत सहभागी होण्याचे जाहीर आवाहन ज्यांच्या अंगी शिक्षणव्रत आहे,शिक्षण क्षेत्रासाठी कार्य करण्याची तळमळ आहे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची तयारी आहे,अशा सर्व शिक्षक,प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने या संघटनेशी जोडावे,असे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.महाराष्ट्रभर संघटनात्मक ताकद निर्माण करण्यासाठी जिल्हा, तालुका,विभागीय तसेच राज्यस्तरीय कार्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी पुढे यावे आणि आपल्या सहकाऱ्यांना जोडावे,असे आवाहन करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी प्रा.प्रमोद वाघमोडे (8108203793) यांच्याशी संपर्क साधावा.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement