गोवेली ग्रामीण रुग्णालय परिसरात नर्सचा मृतदेह आढळल्याने खळबळ
राजू टपाल.
टिटवाळा:- कल्याण तालुक्यातील गोवेली या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालय परिसरात कामिनी गायकवाड या नर्सचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली असून
हा अपघात की इतर काही प्रकार घडला आहे याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
गोवेली या मध्यवर्ती ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे. कल्याण नगर आणि बदलापूर टिटवाळा या रस्त्यावर हे रुग्णालय असल्याने येथे कायमच पेंशटची गर्दी असते. अशातच सध्या रुग्णालयाच्या समोरील क्रिडा संकुलाच्या मैदानावर वारकरी संप्रदायाचा अंखड हरिनाम सप्ताह सुरु आहे. यासाठी परिसरातून दररोज हजारो वारकरी, नागरिक येथे येत आहेत, शिवाय पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे. रुग्णालयाच्या पाठिमागे कामिनी गायकवाड या नर्सचा मृतदेह सापडल्याने चर्चेला उधाण आलेले आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता समजले की, कोरोना काळात या नर्सने गोवेली ग्रामीण रुग्णालय येथे ड्यूटी केली होती, कोरोना काळ संपल्यानंतर त्यांची बदली ठाणे सिव्हिल हाँस्पीटल येथे झाली होती. परंतु त्या ९/१० महिन्यापासून कामावर जात नव्हत्या,त्या गोवेली येथेच राहत होत्या. शिवाय मानसिक त्रास असल्याने त्यांच्या वागण्यातून दिसून येत होते, त्यांना एक मुलगा एक मुलगी असून त्या मुळच्या नाशिक जिल्ह्यातील असल्याचे समजते. त्या राहत असलेल्या इमारतीच्या टेरेस वर झाडांना पाणी घालण्यासाठी गेल्या असता वरुन पडल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या डोक्याला व पायाला मार असून पीएम केल्यानंतर तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. नातेवाईकांनी कोणावरही संशय घेतला नसल्याची माहिती मिळत आहे. सदरची घटना दुपारी घडल्यानंतर संध्याकाळी या परिसरात काम करणाऱ्या मजूर लोकांना ते कळल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे रुग्णालयाच्या आवारात येथे राहत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत कल्याण तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांनी सदरील मयत व्यक्ती ही दररोज झाडांना पाणी टाकण्यासाठी टेरेस वर जात होती. त्यांना दोन मुले ही आहेत. त्यांचा रक्तदाब कमी झाल्यामुळे त्या तोल जाऊन पडल्या असाव्यात असा कयास त्यांनी व्यक्त केला.