• Total Visitor ( 441953 )
News photo

कंटेनर -दुचाकी अपघातात एक जण मृत्यूमुखी 

Raju Tapal publisher March 20, 2026 34

कंटेनर -दुचाकी अपघातात एक जण मृत्यूमुखी 

         

शिक्रापूर:- कंटेनर -दुचाकी या दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शिरूर तालुक्यातील कोंढापुरी पासून शिरूर च्या‌ दिशेने दीड - दोन किलोमीटर अंतरावरील सुरूची डेअरी वळण काॅर्नरजवळ गुरूवार दि.१९ मार्चला सायंकाळी साडेपाच - पावणेसहा वाजण्याच्या सुमारास पुणे -अहिल्यानगर महामार्गावर घडली. अपघातातील मृत दुचाकीस्वाराचे नाव,पत्ता समजू शकला नाही. अपघातातील कंटेनर क्रमांक एम एच ४३ बी एक्स १६७८ पुण्याच्या दिशेने जात होता. त्याचवेळी एम एच १० बी बी ५०५८ या दुचाकीवरील दुचाकीस्वार सुरूची डेअरी जवळील डिव्हायडर जवळ पुण्याच्या दिशेने वळण घेत असताना हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले दुचाकी कंटेनरच्या चाकाखाली आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. अपघाताच्या ठिकाणी रक्ताचा सडा दिसून येत होता. शिक्रापूर पोलीसांनी घटनास्थळी येवून नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त दुचाकीस्वाराला शिक्रापूर येथील रूग्णालयात रूग्णवाहिकेतून दाखल केले असेही समजले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement