• Total Visitor ( 351351 )
News photo

राज्याला वादळी वाऱ्यासह 'मुसळधार' पावसाचा ऑरेंज अलर्ट

Raju tapal May 17, 2025 57

राज्याला वादळी वाऱ्यासह 'मुसळधार' पावसाचा ऑरेंज अलर्ट;

२५ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट 



मुंबई :- राज्यातील वातावरणात मोठे बदल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळाला आहे, आता प्री मान्सूनचे आगमन झाले आहे.राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण कायम राहणार असून, काही भागात पावसाची शक्यता असल्याने अलर्ट जारी करण्यात आले आहेत. पुणे, पालघर, ठाणे, मुंबई, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागांमध्ये आकाश ढगाळ राहणार असून, दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये प्रचंड विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळं देशभरातील अनेक राज्यांमध्ये पुढील 4 ते 5 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात देखील पुढील आठवडाभरात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून, 21 व 22 मे रोजी कोकण गोवा, मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत वाऱ्यासह मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, या अंदाजामुळे केरळ, तसेच महाराष्ट्रात देखील मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. राज्यात पुढील आठवड्यात देखील पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यात 20, 21 व 22 मे रोजी तळ कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दि. 31 मे पर्यंत म्हणजेच मान्सून केरळात दाखल होईपर्यंत, मुंबईसह कोकण व संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अशा चौदा जिल्ह्यांत मान्सूनपूर्व वळवाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement