• Total Visitor ( 435808 )
News photo

उत्तमसरा येथे पालक सभेचे आयोजन

Raju tapal July 26, 2025 66

पालक सभेत विविध शैक्षणिक विषयावर चर्चा



उत्तमसरा येथे पालक सभेचे आयोजन



अमरावती/भातकुली :- पंचायत समिती भातकुली मधिल गणोरी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उत्तमसरा येथे शुक्रवार दि.२५जुलैला पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या पालक सभेत विविध शैक्षणिक विषयावर चर्चा करण्यात आली. विद्यार्थांच्या शैक्षणिक प्रगती,विद्यार्थांच्या करीता विविध सुविधा,शिष्यवृती,शालेय पोषण आहार अश्या विविध विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली.

या सभेचे अध्यक्ष उत्तमसराचे सरपंच धर्मेद्र मेहरे होते तर प्रमुख अतिथी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नदीप सवाई,उपाध्यक्ष प्रिया मानकर,सदस्या अनुराधा भिंगारे,वनिता जोगी,मुख्याध्यापिका मिनाक्षी इंगळे,सहा.शिक्षक राजेश सावरकर,गजानन येलोने,प्रमोद कांबळे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन हारार्पन करण्यात आले. प्रास्ताविक मधुन  मिनाक्षी इंगळे यांनी शाळेच्या विविध योजना,वर्ग १ते५च्या विद्यार्थांची शैक्षणिक प्रगती,शाळा व्यवस्थापन समितीत रीक्त जागेवर पालकाची नेमणूक,प्रत्येक विद्यार्थाचे आभा कार्ड व आधार कार्ड काढणे,परीक्षेचे नियोजन,स्पर्धा परीक्षा,बीपीएल मुलिंचा उपस्थिती भत्ता,सुर्वण महोत्सव शिष्यवृती,बालचिञ स्पर्धा,विद्यार्थी उपस्थिती व होमवर्क याचा आढावा,शालेय गणवेश,अॅनिमिया मुक्त गाव या अंर्तगत मातांची मोफत तपासणी करुन योग्य आहाराची माहीती.तिन शालेय समित्या गठीत करणे,विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती,महिला तक्रार निवारण समिती,सखी साविञी समिती याचे गठण करण्यात आले,शालेय पोषण आहार व पुरक आहार याचा दररोजचा मेनू याची माहीती देण्यात आली,विद्यार्थांच्या लैगिक समस्या या बाबत पालकांनी कसे जागृत असावे या बाबत माहीती देण्यात आली.उपस्थित मान्यवर व पालक यांनी शाळेच्या शैक्षणिक व विविध उपक्रम या बाबत समाधान व्यक्त केले.

या सभेला आश्विनी पवार,सविता जुनघरे,माधुरी सवाई,रोहीनी सवाई,रुपाली मालधुरे,ममता बोरेकर,ज्योती रगडे,ऐश्वर्या ठाकुर,सारीका ठाकरे,शितल मांगे,निता सवाई,अलका मानकर,श्वेता मेहरे,मेघा मालधुरे,अर्पणा झाडे,संगिता कराळे,श्र्वेता बोबडे यांच्यासह इतर पालक उपस्थित होते. सभेचे सुञसंचालन गजानन येलोने तर आभार प्रर्दशन राजेश सावरकर यांनी केले.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement