पुण्याचे माजी उपमहापौर नंदकुमार मोझे या़ंचे निधन
शिरूर;-पुण्याचे माजी उपमहापौर नंदकुमार उर्फ नंदू धाकू मोझे यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,एक मुलगी,जावई ,सुना,नातवंडे असा परिवार आहे.
१९९२ मध्ये पुणे महानगरपालिकेत येरवडा विभागातून काॅंग्रेस पक्षाकडून नंदकुमार मोझे निवडून आले होते.
पुणे महापालिकेचे सभासद ,स्थायी समिती सदस्य तसेच उपमहापौर ( १९९६-९७ ) म्हणून त्यांनी काम केले.काॅंग्रेस पक्षाच्या गाडगीळ गटाचे ते सक्रिय सदस्य होते. माजी महापौर हंबीरराव मोझे, माजी आमदार प्रकाश ढेरे यांचे ते निकटवर्तीय होते. सुरूवातीच्या काळात त्यांनी पुणे महापालिकेच्या पी एम टी मध्ये कंडक्टर म्हणून काम केले.१९९५ साली येरवडा वार्डातून पुणे महापालिकेची निवडणूक लढवून ते विजयी झाले.
१९९७ मध्येही त्यांनी निवडणूक लढविली परंतू त्या निवडणुकीत त्यांना अपयश आले. सोमवारी सायंकाळी त्यांना उपचारासाठी पुण्यातील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.उपचार सुरू असताना मंगळवारी सायंकाळी ५ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. दैनिक प्रभात पुणे आवृत्तीने माजी उपमहापौर नंदकुमार मोझे यांच्या निधनाच्या वृत्तास प्रसिद्धी दिली आहे.माजी उपमहापौर नंदकुमार मोझे यांच्या निधनानिमित्त आठवण सांगताना टिटवाळा न्यूज चे पत्रकार विजय ढमढेरे यांनी सांगितले,माझे चुलते कै.बंडोपंत गोविंदराव ढमढेरे हे पुण्यात शिक्षक होते. ते पुण्यात राहात असत.मी लहान असताना माझे चुलते गणेशोत्सव काळात पुण्यातील गणपती पाहावयास नेत असत.ते मला घोडा टांग्यातून तसेच रिक्षातूनही फिरवत असत.पुण्यातील राजकारण्यांचा, राजकीय पदाधिका-यांचा त्यांचा जवळून परिचय होता. माजी उपमहापौर नंदकुमार मोझे यांचे निकटवर्तीय माजी महापौर हंबीरराव मोझे महापौर असताना गणेशोत्सव काळात स.प.महाविद्यालय (एस पी काॅलेज ) परिसरातील,लक्ष्मी रोड चौकात आले असताना त्या चौकाजवळील एका फोटो स्टुडिओत माजी महापौर हंबीरराव मोझे यांच्या समवेत बाकावर बसून माझा फोटो काढला होता.
माजी उपमहापौर नंदकुमार मोझे तसेच माझे चुलते कै.बंडोपंत गोविंदराव ढमढेरे (शिक्षक) यांना माझ्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली.