• Total Visitor ( 481952 )
News photo

आर्थिक फसवणूकप्रकरणी संशयित महिलेच्या पोलीस कोठडीत वाढ

Raju tapal June 26, 2025 75

आर्थिक फसवणूकप्रकरणी संशयित महिलेच्या पोलीस कोठडीत वाढ...



फसवणुकीचा आकडा २५ लाखापर्यंत



देवगड :- देवगड तालुक्यातील जामसंडे येथील महिलांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी देवगड-पवनचक्की येथील श्रद्धा प्रकाश मोंडकर उर्फ आकांक्षा अतुल घुरी (३६) या संशयित महिलेच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने तिला शनिवारी देवगड पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले.जिल्हा सत्र न्यायालयाने संशयित श्रद्धा मोंडकर हिच्या पोलीस कोठडीत २५ जूनपर्यंत बाढ केली आहे.



दरम्यान,संशयित महिलेविरुद्ध आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीमध्येही वाढ होत असून हा आकडा २५ लाखांपर्यंत पोहोचला आहे.त्यामुळे संशयितेविरोधात आर्थिक फसवणुकीची अन्य कोणाची तक्रार असल्यास त्यांनी देवगड पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा,असे आवाहन पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांनी केले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शेअर मार्केटमध्ये दर महिना चांगला परतावा देणारी गुंतवणूक स्किम असल्याचे आमिष दाखवून संशयित श्रद्धा मोंडकर हिने जामसंडे येथील एका महिलेची पाच लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली होती.या घटनेची फिर्याद पीडित महिलेच्या पतीने देवगड पोलीस स्थानकात करून अन्य काही आर्थिक फसवणूक झालेल्या महिलांची नावे व फसवणुकीची रक्कम फिर्यादीतून पोलिसांना दिली होती.एकूण पाच महिलांची संशयित महिलेने सुमारे १२ लाख ७२ हजार ४०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीतून स्पष्ट झाले होते.त्यानुसार देवगड पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली होती.देवगड न्यायालयाने संशयित महिलेला २१ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या घटनेच्या तपासादरम्यान संशयित महिलेविरुद्ध आर्थिक फसवणुकीच्या अजून काही पीडितांच्या तक्रारी देवगड पोलीस स्थानकात प्राप्त झाल्या असून हा आकडा २५ लाखांपर्यंत पोहोचला आहे.



दरम्यान,संशयित महिलेची शनिवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने तिला देवगड पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले न्यायालयाने संशयित महिलेच्या पोलीस कोठडीत २५ जूनपर्यंत वाढ केली आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव करीत आहेत.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement