• Total Visitor ( 506243 )
News photo

कल्याणमधील फळ विक्रेता ठेवायचा 'असे' स्टेटस,पोलिसांनी मुसक्या आवळल्या

Raju Tapal publisher May 02, 2026 191

कल्याणमधील फळ विक्रेता ठेवायचा 'असे' स्टेटस,पोलिसांनी मुसक्या आवळल्या



घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले पोलीस ठाणे येथील पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहताच आरोपीने तत्काळ आपले स्टेटस डिलीट केले. कल्याणमध्ये फळ विक्रेत्याचा धक्कादायक प्रताप उघडकीस आला आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी एका फळ विक्रेत्याला अटक केली आहे. विनीत सिंग असं आरोपीचे नाव आहे असून मी संविधान मानत नाही असं अशा प्रकारचे आक्षेपार्ह स्टेटस तो ठेवत होता. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. फळ विक्रेत्याचा प्रताप,पोलिसांनी मुसक्या आवळल्या याबाबत सविस्तर माहिती अशी की,कल्याण मधील चिकन घर परिसरात राहणारा विनीत सिंह फळ विक्रेता गेल्या काही दिवसांपासून आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर सतत आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करत होता. कधी एखाद्या समाजाविरोधात तर कधी महापुरुषांबद्दल अपमानास्पद उल्लेख तो करत होता. इतकेच नव्हे,तर “मी भारतीय संविधान मानत नाही” असेही त्याने स्टेटस ठेवले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर एका सतर्क महिलेने त्याच्या दुकानात जाऊन समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र विनीत सिंहने तिचे ऐकून न घेता तिच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. या घटनेदरम्यान परिसरात मोठी गर्दी जमली. घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले पोलीस ठाणे येथील पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहताच आरोपीने तत्काळ आपले स्टेटस डिलीट केले. मात्र पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त करून तपास केला असता आक्षेपार्ह पोस्ट्सचे पुरावे समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी विनीत सिंगविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तो मूळचा प्रयागराज येथील रहिवासी असून कल्याणमध्ये फळ विक्रीचा व्यवसाय करत होता. सध्या या घटनेमुळे परिसरात चर्चा रंगली असून,सोशल मीडियावर जबाबदारीने वागण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement