• Total Visitor ( 430986 )
News photo

पूजाताई अश्विन जोगदंड पॅनल क्रमांक ४ मधून निवडणूक लढविणार 

Raju tapal November 29, 2025 300

पूजाताई अश्विन जोगदंड पॅनल क्रमांक ४ मधून निवडणूक लढविणार 

राजू टपाल. 

टिटवाळा :- केडीएमसीच्या पॅनल क्रमांक ४ मधून शिवसेनेच्या पूजाताई अश्विन जोगदंड ह्या अनुसूचित जातीच्या महिला आरक्षणातून निवडणूक लढविणार आहेत.  पूजाताई अश्विन जोगदंड ह्या शिवसेनेचे कल्याण उपशहर प्रमुख अंकुश जोगदंड यांच्या लहान वहिनी आहेत. अंकुश जोगदंड यांनी शिवसेनेच्या माध्यमातून विविध प्रकारची व विविध ठिकाणची विकास कामे केलेली आहेत. यात प्रामुख्याने एनआरसी कॉलनी ते आर.एस.कॉलनी परिसरातील पथदिवे बसविले आहेत. तसेच एनआरसी कॉलनी ते तिपन्ना नगर येथील सुद्धा पथदिवे बसविले आहेत. जेतवन नगर येथील राहुल नगर येथे पायवाटा,गटारे,अंतर्गत रस्त्याची कामे केलेली आहेत. आदिवासी पाडा येथे कधी न केलेले बंदीस्त गटारे व पायवाटा यांचे कामे केलेले आहेत. आर.एस.त्रिकोण ते वैकुंठ धाम स्मशानभूमी पर्यंतचा रस्ता बनविला. त्यासाठी एनआरसी कंपनीकडून परवानगी घेऊन त्या जागेवर वैकुंठ धाम स्मशानभूमी बनवली आहे. आर.एस.गाळेगाव,महात्मा फुले नगर या ठिकाणी सार्वजनिक वाचनालय उघडण्यात आले. तिपण्णा नगर येथे विविध विकास कामे करण्यात आलेली आहेत. यात प्रामुख्याने तिपन्ना नगर या  ठिकाणी लग्न,सांस्कृतिक सार्वजनिक कार्यक्रम करीता स्टेज बनविला. तिपण्णा नगर येथील मुत्थामारी मंदिरासाठी आर्थिक योगदान करण्यात आलेले आहे. तसेच जेतवन नगर मधील प्रज्ञा बुद्धविहारासाठी आर्थिक योगदान दिले. राहुल नगर परिसरात सांस्कृतिक कार्यक्रम व लग्नासाठी ओपन स्टेज बनविण्यात आला आहे. मोहने येथील मेन गेट या ठिकाणी शिवसेना शाखा उभारली. संपूर्ण भारतात लॉकडाऊन असताना एन.आर.सी.कॉलनी,महात्मा फुले नगर,जेतवन नगर,तिपण्णा नगर या परिसरात नागरिकांना भोजनदान इतर गरजू वस्तूंचे वाटप करून सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.एन.आर.सी.कॉलनी येथील शालेय विद्यार्थ्यांकरिता रस्त्याचे डांबरीकरण करून घेण्यात आले. एनआरसी परिसरातील नागरिकासाठी लाईट व पिण्याच्या पाण्याचा मुख्य प्रश्न प्रश्न सोडण्यात आला. या सर्व कामांच्या जोरावर होय आम्ही सक्षम आहोत सर्वांगीण विकास घडवायला हे ब्रीद वाक्य घेऊन तुमचे मत तुमचा विचार परिवर्तनाचा करू विचार असा संदेश देत निवडणूक लढविणार आहेत. त्यासाठी परिसरातील नागरिक आपल्याला भरघोस मदत करतील असा विश्वास शिवसेना उपशहर प्रमुख अंकुश जोगदंड यांना वाटत असून त्यासाठी त्यांनी आपली वहिनी  पूजाताई जोगदंड यांना त्याच जोरावर बिनधास्तपणे निवडणूक लढविणाण्यास उभे केले आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement