• Total Visitor ( 702598 )
News photo

शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार - कान्हूरमेसाई रस्त्यावर खड्डे 

Raju tapal March 09, 2026 69

शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार - कान्हूरमेसाई रस्त्यावर खड्डे 

            

शिक्रापूर:- शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार -कान्हूर मेसाई रस्त्यावर खड्डे पडून या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. या रस्त्यावरून मिडगुलवाडी गावाकडे जाणारे -येणारे प्रवासी प्रवास करत असतात. शिक्रापूर -कान्हूर मेसाई हा रस्ता कान्हूर मेसाई‌ गावाजवळ शिरूर -पाबळ रस्त्याला जोडलेला असून कान्हूर मेसाई येथे प्रसिद्ध मेसाई‌ देवीचे अतिशय प्रसिद्ध देवस्थान आहे. मेसाई देवीचे दर्शन घेणारे भाविक,धार्मिक क्षेत्रातील नागरिक,प्रवासी या रस्त्यावरून प्रवास करत असतात. या रस्त्यावरील हिवरे कुंभार हे विधानपरिषदेचे माजी सभापती स्व.वसंतराव डावखरे यांचे गाव असून पिंपळे खालसा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या रस्त्याच्या कडेलाच आहे. शिक्रापूर पासून हिवरे कुंभार गावापर्यंत रस्त्याची अवस्था चांगली आहे. या रस्त्यावरील खैरे वाडी,दिवानमळा परिसरात रस्त्यावरही खड्डे पडलेले आहेत. मिडगुलवाडी हे धार्मिक क्षेत्रातील ग्रामस्थांचे गाव समजले जात असून मिडगुलवाडी गावापासून शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष,जेष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर महाराज मिडगुले यांच्या ज्ञानयोग अध्यात्म निवासस्थानाकडे‌ जाणा-या रस्त्याचे काही अंतरापर्यंत ब-याच वर्षांपूर्वी डांबरीकरण झालेले आहे.उर्वरीत रस्त्याची काही अंतरापर्यंत अवस्था अतिशय खराब आहे. मिडगुलवाडी गावापासून ज्ञानयोग अध्यात्म कडे जाणा-या रस्त्याची दुरूस्ती करण्याबरोबरच कान्हूरमेसाई गावापासून हिवरे कुंभार गावापर्यंत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची दुरूस्ती करणे अतिशय गरजेचे आहे.

      


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026