• Total Visitor ( 449515 )
News photo

राहू -वाघोली रस्त्यावर खड्डे

Raju tapal February 04, 2026 32

राहू -वाघोली रस्त्यावर खड्डे

        

शिक्रापूर:- राहू -वाघोली रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. या रस्त्यावरून राहू,पाठेठाण,विठ्ठलवाडी,सांगवी सांडस,न्हावी सांडस,पिंपळगाव,देलवडी,पारगाव,शिंदेवाडी,हिंगणगाव,अष्टापूर चौक,वाडेबोल्हाई,केसनंद,वाघोली या गावांकडे जाणारे - येणारे वाहनचालक व प्रवासी प्रवास करत असतात. या रस्त्याच्या कडेला गुळ उत्पादकांची गु-हाळे आहेत. या रस्त्यावरून ऊस वाहतूक करणारी वाहनेही प्रवास करत असतात. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झालेली असल्याने ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्राॅली हेलकावून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुचाकीस्वारांनाही रस्त्यावरील खड्डे चुकवत मार्गक्रमण करत या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावरून शिरूर,दौंड,हवेली या तीन तालुक्यांतील प्रवासी,वाहनचालक प्रवास करत असतात. या रस्त्यावरील खड्ड्यांची दुरूस्ती करणे अतिशय गरजेचे आहे.



प्रतिनिधी:- विजय ढमढेरे



 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement