• Total Visitor ( 84883 )

प्रकाश आंबेडकरांना हृदयविकाराचा झटका

Raju tapal October 31, 2024 154

प्रकाश आंबेडकरांना हृदयविकाराचा झटका, 
आजच अँजिओग्राफी होणार
पुणे: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यावर अँजिओग्राफी होणार असल्याची माहिती आहे. प्रकाश आंबेडकर यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती पक्षाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी आढळल्याने त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तीन ते पाच दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतील असंही सांगण्यात आलं आहे.
 

Share This

titwala-news

Advertisement