• Total Visitor ( 704238 )
News photo

दशावतारातील स्त्री भुमिका गाजवणारे कलावंत प्रशांत मेस्त्री यांचे निधन

Raju tapal August 02, 2025 97

दशावतारातील स्त्री भुमिका गाजवणारे कलावंत प्रशांत मेस्त्री यांचे निधन



सिंधुदुर्ग :- दशावतार नाट्यकलेमध्ये आपल्या उत्कृष्ट स्त्री भूमिकांसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ कलाकार प्रशांत मेस्त्री यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने दशावतार क्षेत्रातील कलाकारांमध्ये आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.



गेली अनेक वर्षे मेस्त्री यांनी दशावतार रंगभूमीवर आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. त्यांच्या अचानक जाण्याने दशावतार कला क्षेत्राची मोठी हानी झाली असून, त्यांच्या आठवणींना उजाळा देत अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत. त्यांच्या निधनाने एका उत्कृष्ट कलाकाराला आपण मुकलो, अशा भावना दशावतारप्रेमी व्यक्त करत आहेत.



त्यांची अंत्ययात्रा शनिवार 2 ऑगस्ट रोजी सकाळी 9 - 30 वाजता त्यांच्या राहत्या घरातून हरकुळ खुर्द सुतारवाडी येथून निघणार आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026