• Total Visitor ( 449646 )
News photo

निकोबार बेटावर वेळेआधीच मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता 

Raju tapal May 02, 2025 49

निकोबार बेटावर वेळेआधीच मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता 



मुंबई :- देशभरात उन्हाळ्याचा कडाका वाढत असतानाच दक्षिण भारताच्या दिशेने मोसमी पावसाच्या आगमनाची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. हवामान अभ्यासकांच्या प्राथमिक अंदाजानुसार यंदा मोसमी पाऊस वेळेच्याआधीच निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे.



हवामान अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, अंदमान आणि निकोबार बेटांजवळील समुद्रसपाटीवर सध्या ढगांच्या हालचाली आणि वार्‍याचा वेग यामध्ये लक्षणीय बदल दिसून येत आहेत. हे लक्षण वेळेआधी मोसमी पावसाच्या आगमनाची चाहूल देत आहे. सामान्यतः मोसमी पाऊस मेच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या आठवड्यात या भागात दाखल होतो. मात्र, यंदा तो एक आठवडा आधी दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. निकोबार बेटांवर मोसमी पाऊस कधी दाखल होतो, यावरून भारतात नैऋत्य मोसमी वार्‍याची प्रगती, वेग, वेळ, आणि पावसाचा अंदाज बांधला जातो. त्यामुळे येथील बदलांकडे संपूर्ण देशाचे लक्ष असते.



निकोबार बेटांवर मोसमी पाऊस सामान्यतः 15 मेच्या आसपास दाखल होतो. भारतातील मोसमी पावसाचे सर्वप्रथम आगमन होणारा हा भाग आहे. या भागात पूर्वी 10 मे, अथवा 18 ते 20 मेदरम्यान मोसमी पाऊस दाखल झाला आहे . यंदा मात्र 10 मेच्या आसपास मोसमी पाऊस दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याआधी 17 वर्षांपूर्वी म्हणजेच 2007 आणि 2008 साली 10 मे रोजी निकोबार बेटांवर मोसमी पाऊस दाखल झाला होता.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement