• Total Visitor ( 701986 )
News photo

पुरोगामी माध्यमिक विद्यालय आसरा ता. भातकुली राखली उज्वल यशाची परंपरा कायम

Raju tapal May 16, 2025 102

पुरोगामी माध्यमिक विद्यालय आसरा ता. भातकुली राखली उज्वल यशाची परंपरा कायम. 



भातकुली दि.१६ :- यावर्षी  वर्ग १० वी चा निकाल ९४.३३ भातकुली तालुक्यातील पुरोगामी विद्यालय आसरा येथील इयत्ता १० वी ला या वर्षी ५३ विद्यार्थी परि त्यापैकी ५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले, विद्यालयाचा निकाल ९४.३३ लागला. 

प्रथम क्रमांक कु. पुजा धनराज दहातोंडे हिने ८९.६० गुण घेऊन पटकावला. तर द्वितीय क्रमांक कु. दिव्या धनराज मेश्राम हिने ८७.२० गुण घेऊन तर तिसरा क्रमांक कु तन्वी सुनिल भटकर हिने ८५.६० टक्के गुण घेतले. तसेच प्राविण्य प्राप्त विद्यार्थी मंजुशा अनमोल ठाकरे ८४.८०किरण संजय वानखडे ८४.२० भावना भिमराव सोळंके ८४.००मो. शाहिद ७७.२० गौरी संतोष जाधव हिला ७४.८० गुण मिळाले. 

या यशामुळे विद्यालयाचे शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. शाळेत नियमित होणारे उपक्रम, प्रदर्शनी, सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच विद्यार्थ्यांनी १० वी च्या परीक्षेत सुद्धा उत्तम यश प्राप्त केल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका विल्हेकर मँडम, वर्ग शिक्षक वडतकर सर,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026