• Total Visitor ( 481990 )
News photo

संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा शिरूरमध्ये निषेध           

Raju tapal July 15, 2025 56

संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा शिरूरमध्ये निषेध           



शिक्रापूर (प्रतिनिधी) :- संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा शिरूर शहरात निषेध करण्यात आला.

तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना दिलेल्या निवेदनात हल्लेखोरांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेला भ्याड हल्ला निषेधार्ह असून हल्ल्याच्या सुत्रधारावर कारवाई करावी,विचारांची लढाई विचाराने करण्याची आपली परंपरा आहे. आम्ही सर्व या अविवेकी हल्ल्याचा निषेध करतो.छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले,भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या उज्वल परंपरेतून, अनेक संतांच्या विचारांतून महाराष्ट्रामध्ये बंधू भावाचा महाराष्ट्र धर्म, सुधारणावादी नेतृत्वाची जडणघडण झालेली आहे असे निवेदनात म्हटले आहे.

माजी आमदार पोपटराव गावडे, लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रविंद्र धनक, जनता दलाचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर यांच्यासह समस्त सकल मराठा समाज संघाचे पदाधिकारी, शिरूर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी पदाधिकारी तसेच विविध राजकीय पक्ष, विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

 .      


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement