• Total Visitor ( 516563 )
News photo

पुणे -अहिल्यानगर महामार्ग‌‌‌ ते खंडाळे रस्ता डांबरीकरण पूर्ण

Raju Tapal publisher May 18, 2026 20

पुणे -अहिल्यानगर महामार्ग‌‌‌ ते खंडाळे रस्ता डांबरीकरण पूर्ण



शिरूर:-पुणे-अहिल्यानगर महामार्गापासून शिरूर तालुक्यातील खंडाळे गावाकडे जाणा-या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे.अष्टविनायकांपैकी प्रसिद्ध तिर्थक्षेत्र रांजणगाव गणपती गावापासून पुण्याच्या दिशेने साधारण अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या बंद अवस्थेतील ग्रोवेल टाईम्स घड्याळ कंपनी पासून या रस्त्यास सुरूवात होते.पुणे जिल्हा परिषद बांधकाम विभाग दक्षिण यांच्या वतीने या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले असून या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी २३ लाख ८५ हजार ५९३ रूपये खर्च करण्यात आले आहेत असे फलकावर दर्शविण्यात आलेले आहे.श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथील आठवडे बाजार दर बुधवारी भरत असतो. तसेच रांजणगाव गणपती गावापासून जवळच एम आय डी सी असून रांजणगाव गणपती येथे विद्याधाम प्रशाला शैक्षणिक संस्थेचे विद्यालय आहे.खंडाळे गावातील नागरिक ग्रामस्थ बाजारहाट करण्यासाठी तसेच महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी रांजणगावाला जाण्या -येण्यासाठी या रस्त्याचा वापर करत असतात.तसेच विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी रांजणगावाला जाण्या येण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात.तसेच खंडाळे येथील कामगारवर्गही औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांत कामाला जाण्या येण्यासाठी या रस्त्याचा वापर करत असतात.या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे या मागणीसंदर्भात कोंढापुरी येथील टिटवाळा न्यूज चे पत्रकार विजय संभाजीराव ढमढेरे यांनी नुकतीच बातमी प्रसिद्ध केली होती.या रस्त्याचे पुणे -अहिल्यानगर महामार्गापासून खंडाळे गावापर्यंत डांबरीकरण करण्यात आल्याने खंडाळे गावातील ग्रामस्थ जयसिंगराव दरवडे यांनी टिटवाळा न्यूजचे पत्रकार विजय ढमढेरे यांचे आभार मानून पत्रकार विजय ढमढेरे यांच्या पत्रकारितेला शुभेच्छा दिल्या.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement