• Total Visitor ( 509917 )
News photo

पुणे विद्यापीठ विभागीय क्रीडा समिती सभा यशस्वीरित्या संपन्न

Raju Tapal publisher May 01, 2026 61

पुणे विद्यापीठ विभागीय क्रीडा समिती सभा यशस्वीरित्या संपन्न

           

तळेगाव ढमढेरे महाविद्यालयास संयोजनाचा मान

           

शिरूर:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती आणि शिक्षण प्रसारक मंडळाचे साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रीडा समितीची द्वितीय सभा यशस्वीरित्या संपन्न झाली. साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात आयोजित केलेल्या या बैठकीसाठी पुणे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि शारीरिक शिक्षण संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे संचालक सुदाम शेळके,इंदापूर तालुका ग्राम विकास प्रतिष्ठानचे सचिव विरसिंह रणसिंग,विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ. रमेश गायकवाड,शिक्षण प्रसारक मंडळ आणि विद्या सहकारी बँकेचे विद्यमान संचालक महेश बापू ढमढेरे,पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे,सचिव डॉ. अमेय काळे, प्राचार्य डॉ. पंडित शेळके,प्राचार्य बी.पी. पाटील,प्राचार्य डॉ. अशोक काळंगे,डॉ .जयवंत बाबर,डॉ . रावसाहेब गरड यांसह विविध मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. प्रारंभी महाराष्ट्र गीत आणि पुणे विद्यापीठ गीताने सभेचा प्रारंभ झाला. विभागीय क्रीडा समितीचे सचिव प्रा. डॉ. अमेय काळे यांनी मान्यवरांचे स्वागत करून शैक्षणिक वर्ष २०२५ - २६ मधील क्रीडा समितीच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पराग चौधरी यांनी मान्यवरांचा सभेस परिचय करून दिला. 

 इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव विरसिंह रणसिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीच्या बैठकीचे उद्घाटन झाले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवणे काळाची गरज असून विद्यापीठाने त्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता आणि क्षमता असतेच. मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे असल्याचे श्री. रणसिंग यांनी यावेळी सांगितले. प्रस्तुत बैठकीचे स्वागताध्यक्ष असलेल्या श्री. महेशबापू ढमढेरे यांनीही याप्रसंगी उपस्थित क्रीडा शिक्षकांना मार्गदर्शन केले. सुदृढ आरोग्य ही आजच्या काळाची आवश्यकता आहे. युवकांनी आपल्या क्षमता ओळखून तंदुरुस्तीकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थी हाच घटक केंद्रबिंदू म्हणून शिक्षण प्रसारक मंडळ सातत्याने विविध उपक्रम राबवीत असल्याचेही महेश बापू ढमढेरे यावेळी म्हणाले. प्राचार्य डॉ.अर्जुन मुसमाडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीची जबाबदारी तळेगाव ढमढेरे महाविद्यालयास दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. विद्यापीठस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून अनेक स्पर्धकांनी सहभागी होऊन प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल त्यांनी महाविद्यालये, क्रीडा संचालक आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले. क्रीडा विभागाशी संबंधित कोणतीही जबाबदारी भविष्यामध्ये सक्षमपणे सांभाळण्यासाठी साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालय तत्पर आणि सक्षम असल्याचेही प्राचार्य डॉ.मुसमाडे यांनी याप्रसंगी सांगितले. प्राचार्य डॉ.पंडित शेळके आणि प्राचार्य डॉ. बी.पी पाटील,डॉ. रमेश गायकवाड,डॉ. रावसाहेब गरड यांनी प्राचार्य व प्राध्यापकांच्या वतीने प्रतिनिधिक स्वरूपात सभेस संबोधित केले. याप्रसंगी शैक्षणिक वर्ष २०२५ - २६ मध्ये विविध महाविद्यालयांतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच शैक्षणिक वाटचालीत विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या क्रीडा संचालकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याशिवाय पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीच्या वतीने उत्कृष्ट शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  महिला विभागात लोणीकंद येथील रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयातील डॉ. सुषमा तायडे,पारंपरिक महाविद्यालय विभागात आकुर्डी येथील प्रा.रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील प्रा.डॉ. ज्ञानेश्वर चिमटे यांचा तर व्यावसायिक महाविद्यालय विभागात दिघी येथील डॉ. विशाल परदेशी आदींना विशेष सन्मान देऊन गौरविण्यात आले. याशिवाय विभागीय क्रीडा समितीच्या वतीने उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार देखील याप्रसंगी प्रदान करण्यात आले. कळंब वालचंदनगर येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयास सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. याशिवाय आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालय दिघी, सासवड येथील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय आणि पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय आदी महाविद्यालयांना उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रस्तुत पुणे जिल्हा विभाग क्रीडा समितीच्या या सभेस विविध महाविद्यालयातील ९५ क्रीडा संचालक आणि प्राचार्य उपस्थित होते. पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीने शैक्षणिक वर्ष २०२५ - २६ मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अध्यक्ष प्राचार्य डॉ .अर्जुन मुसमाडे,डॉ.अमेय काळे,डॉ. सुहास भैरट,डॉ. शितल शेंडकर, डॉ. गणेश चव्हाण,डॉ.अक्षय काशिद, डॉ.प्रीती पवार आणि सचिन शेलार आदींचा विशेष सन्मान केला. 

प्रा. डॉ. संदीप सांगळे यांनी सूत्रसंचालन तर डॉ. सुहास भैरट यांनी आभार मानले.

       


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement