केंद्र आसरा अंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न.
भातकुली/अमरावती- भातकुली पंचायत समिती मधिल केंद्र आसरा अंतर्गत केंद्रस्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन जि.प.पूर्व माध्य मराठी शाळा,आसरा येथे २०नोव्हेंबरला करण्यात आले होते. यावेळी वर्ग ५वा व ६वा यांचा पहिला गट व वर्ग ७ वा व वर्ग ८वा यांचा दुसरा गट व वर्ग ९वा. व १० वा यांचा तिसरा गट अशा गटात विभागणी करून प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली. पहिल्या गटाला परीक्षक म्हणून श्री.दिपक चिंचे सर ,श्री.सुनिल वानखडे सर व श्री.पंकज दहिकर सर यांनी तर दुसऱ्या गटाला श्रीमती छाया पोटेकर मॅडम,श्री.अन्सार सर व श्री शैलेश मांदळे सर यांनी परीक्षक म्हणून काम पाहले. या स्पर्धेत केंद्र आसरा अंतर्गत सर्व शाळा सहभागी झाल्या होत्या. पहिल्या गटात सिद्धेश निलेश मोहोड जि.प.पूर्व माध्यमिक मराठी शाळा आसरा प्रथम क्रमांक कु.खुशी गजानन रामाघरेजि.प.पूर्व माध्य मराठी शाळा नांदेडा खुर्द द्वितीय क्रमांक कु.सृष्टी यशवंत भोपत जि.प.पूर्व.माध्य मराठी शाळा,आसरा तृतीय क्रमांक तर दुसऱ्या गटात वेदांत अनिल थोरात जि.प.पूर्व माध्य मराठी शाळा आसरा प्रथम क्रमांक,कु आदिती प्रविण सोळंकेजि.प.पूर्व माध्य मराठी शाळा,आसराद्वितीय क्रमांक,कु.मैत्रेयी अमोल गुडधे जि.प.पूर्व माध्य मराठी शाळा आसरा तृतीय क्रमांक या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या कार्यक्रमाला मा.गजानन सायंके सर उच्च श्रेणी मुख्याध्यापक आसरा शैलेंद्र स.दहातोंडे केंद्रप्रमुख आसराप्रज्ञा रामटेके मॅडम विशेष शिक्षिका व आसरा केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. या छोट्या व सुंदर स्पर्धेचे संचालन श्री.पंकज दहिकर सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री.प्रभाकर धांडगे सर यांनी केले,स्पर्धा यशस्वी करण्यासाठी केंद्र आसरा अंतर्गत सर्व शाळांचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक बंधूभगिनी यांचे सहकार्य लागले.यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देवून,अभिनंदन करून स्पर्धेची सांगता करण्यात आली.