*रायगडभूषण श्रीराम पुरोहीत यांची सदिच्छा भेट व जनजागृती सेवा समितीच्या वतीने सन्मानित*
Raju tapal
October 03, 2021
31
*रायगडभूषण श्रीराम पुरोहीत यांची सदिच्छा भेट व जनजागृती सेवा समितीच्या वतीने सन्मानित* ---------------------------------------- कर्जत-लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता. कित्येक वर्षे पत्रकारिता केल्यानंतर अध्यात्मिक व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणा-या प्रतिभावंत व्यक्ती *श्रीराम पुरोहीत* यांची कर्जत येथे त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेण्याचा योग आला. श्रीराम पुरोहीत सर कीर्तनकार,प्रवचनकार,व्याख्याते, *tv9मराठी, ZEE24तास आणि लोकशाही न्यूज चॅनलवरील* प्रवचनकार, आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक तसेच आकाशवाणी मुंबई आणि जय महाराष्ट्र वरील शिक्षणतज्ज्ञ अशा विविधाअंगी कार्यरत असणारे प्रसंन्न व्यक्तीमत्व.त्यांच्या चतुरत्र कार्याची दखल घेऊन " *जनजागृती सेवा समिती,महाराष्ट्र* या सामाजिक संस्थेच्यावतीने संस्थापक-अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर व सचिव सौ.संचिता भंडारी यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी जनजागृतीचे सचिन भंडारी,प्रसाद उकार्डे,शुभंम नेटके हे कार्यकर्ते उपस्थित होते. संस्थेच्यावतीने सत्कार केल्याबद्दल श्रीराम पुरोहीत व त्यांच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले.
Share This