• Total Visitor ( 503081 )
News photo

पाण्याचा टॅंकर,ट्राॅली चोरी करणा-या आरोपीस रांजणगाव पोलीसांकडून अटक 

Raju Tapal publisher April 29, 2026 20

पाण्याचा टॅंकर,ट्राॅली चोरी करणा-या आरोपीस रांजणगाव पोलीसांकडून अटक 

      

शिरूर:- पाण्याचा टॅंकर ट्राॅली चोरी करणा-या आरोपीस रांजणगाव एम आय डी सी पोलीसांनी अटक केली असून १ लाख ८० हजार रूपये किंमतीचे दोन टॅंकर व ट्रॅक्टर पोलीसांनी जप्त केला आहे. रांजणगाव येथील अशोक किसन भुजबळ या शेतक-याने शेताकरिता ६ हजार क्षमतेचा टॅंकर ट्राॅली बनवून घेतली होती.दि.११ मार्चला रात्रीच्या वेळी टॅंकर ट्राॅली अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने अशोक किसन भुजबळ यांनी रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. त्यानूसार रांजणगाव एम आय डी सी पोलीस तपास पथकाकडून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू होता.तपास पथकाने रांजणगाव,कारेगाव व परिसरातील सी सी टि व्ही तपासून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू घेणे सुरू असताना पोलीस अंमलदार योगेश गुंड त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की पळवे ता.पारनेर जि‌.अहिल्यानगर येथील एक जण रात्रीचे वेळी ट्रॅक्टर घेवून येवून पाण्याचे टॅंकर ट्राॅली चोरून घेवून जात असल्याबाबत माहिती मिळाली.तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्यातील अज्ञात चोरटा हा त्याच भागातील असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस पथकाने आरोपी संदीप उर्फ पप्पू आबासाहेब जाधव वय -३६ वर्षं रा‌.पळवे बुद्रुक ता‌.पारनेर जि‌.अहिल्यानगर या ठिकाणावरून शिताफीने ताब्यात घेतले.आरोपीकडे सखोल चौकशीत गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या‌ ताब्यातून चोरी गेलेला टॅंकर ट्राॅली जप्त करण्यात आली.तसेच आरोपीस अटक करण्यात आली. सखोल चौकशीत आरोपींनी ढोकेश्वर टाकळी ता‌.पारनेर येथून आणखी एक टॅंकर ट्राॅली चोरून आणली होती तीही जप्त करण्यात आली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार वैभव मोरे करत आहेत.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement