• Total Visitor ( 430524 )
News photo

जेष्ठ नागरिकाची फसवणूक करणा-या दोघांना रांजणगाव पोलीसांनी केली अटक

Raju tapal October 17, 2025 94

जेष्ठ नागरिकाची फसवणूक करणा-या दोघांना रांजणगाव पोलीसांनी केली अटक

      

शिक्रापूर (प्रतिनिधी):- तुमच्या सर्व अडचणी दूर करू अशी बतावणी करून जेष्ठ नागरिकाची फसवणूक करणा-या दोघांना रांजणगाव एम आय डी सी पोलीसांनी अटक केली आहे.

अफताब हुसेन मदारी सोनवणे मळा निघोज,ता‌.पारनेर जि.अहिल्यानगर मूळ रा‌.हलदी मोहल्ला,शिरूर जि.पुणे,लुकमान सुलेमान मदारी रा‌. हल्दी मोहल्ला,शिरूर जि‌.पुणे अशी अटक केलेल्या दोघा आरोपींची नावे असून आरोपींकडून  ५५ हजार रूपये किंमतीची ८ ग्रॅम सोन्याची अंगठी,५० हजार रूपये किंमतीची शाईन मोटरसायकल असा एकूण १ लाख ५ हजार रूपये किंमतीचा ऐवज जप्त केला. शिरूर तालुक्यातील अण्णापूर येथील ६२ वर्षीय शेतकरी किसन विठ्ठल कुरंदळे हे कामानिमित्त रांजणगाव येथे आले असता मोटरसायकल वरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी तुमच्या अडचणी दूर करू,अंगठी द्या असे म्हणून फसवणूक केली. तपासादरम्यान पोलीसांनी घटनास्थळावरील सी सी टी व्ही फुटेज,तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दोन्ही आरोपींना शोधून जेरबंद केले.

       


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement