शिपगाव शाळेचे मुख्याध्यापक दिलीप राऊत यांचा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न
गणोरी केंद्रातर्फे व गावकरी यांच्या कडून सत्कार
शाळेतील विद्यार्थांना लेखन साहीत्य वाटप
अमरावती/भातकुली - पंचायत समिती भातकुली मधिल गणोरी केंद्रातील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिलिप राऊत हे शासकीय नियमानुसार ३०जूनला सेवानिवृत्त झाले.त्यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी गणोरी केंद्रातील केंद्रातर्फे व गावकरी यांच्या कडून त्यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांच्या कडून शाळेतील सर्व विद्यार्थांना लेखन साहीत्य व पाणी बाॅटल वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष मंगेशभाऊ मालधुरे प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका श्रीमती सुलोचना मालधुरे,गणोरी केंद्राच्या केंद्र प्रमुख नीता सोमवंशी,शा.व्य.समितीचे उपाध्यक्ष साहेबराव मोकळकर,उपसरपंच स्वप्नील सरडे,शारदा मालधुरे ग्रापं सदस्या,सुलोचना मालधुरे, गजानन मालधुरे,सुशिल मालधुरे उपस्थित होते.क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व हारार्पण आणि दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.उपस्थित पाहुण्यांच्या व केंद्रातील मुख्याध्यापक यांच्या कडून सेवानिवृत्त दिलिप राऊत व त्यांच्या पत्नी यांचा शाल,श्रीफळ,साडी चोळी आणि भेट वस्तु देऊन सत्कार करण्यात आला.दिलीप राऊत सर गेल्या १५वर्षा पासून येथे उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करत होते.यावेळी माजी व आजी विद्यार्थांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका सुलोचना मालधुरे यांचा सुध्दा सत्कार करण्यात आले.कार्यक्रमाला गणोरी केंद्रातील मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षिका उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र प्रमुख निता सोमवंशी यांनी तर सुञसंचालन कविता रांखोडे आभार प्रदर्शन राजेश सावरकर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्या करीता शाळेच्या शिक्षिका कविता राखोंडे,सुभम वानखडे,अंकीता धंदर,पवण धंदर,मंगेश धंदर,दिपक मालधुरे,गणेश मालधुरे,प्रतिक मोगळकर,तेजक्ष मोगळकर,संमेक किर्तक व समस्त गावकरी मंडळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शैक्षणिक सञाची पहीली शिक्षण परीषद संपन्न
३०जूनला नविन शैक्षणिक सञ २०२५-२६ची पहीली शिक्षण परीषद शिपगाव येथे घेण्यात आली.या शिक्षण परीषद गणोरी केंद्राच्या केंद्र प्रमुख निता सोमवंशी यांनी मार्गदर्शन केले.या शिक्षण परीषद मध्ये CRG गटाचे पुनर्गठन, निपुण महाराष्ट 5 मार्च शासन निर्णय, SQAAF शाळा निहाय आढावा व नियोजन,PAT पायाभुत चाचणी पूर्व तयारी व सराव, माहे जुलै मासिक नियोजन यावर मार्गदर्शन करण्यात आहे.शिक्षण परीषदला गणोरी,उत्तमसरा,परलाम,ईब्रामपूर,खरबी,शिपगाव,शिवणी बु.,शिवणी खुर्द,खल्लार,निंभोरा,बोरगाव,बहादरपूर व गणोरी उर्दू शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक आणि शिक्षिका उपस्थित होत्या.शिक्षण परीषद वंदे मातरम ने शिक्षण परीषदचा समारोप करण्यात आला.