• Total Visitor ( 701049 )
News photo

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न

Raju Tapal publisher September 02, 2026 22

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न



सिंधुदुर्ग :- अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम,1989 अंतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) शारदा पोवार यांच्या अध्यक्षतेखाली दि.31 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. बैठकीस सहायक संचालक,सरकारी अभियोक्ता ममता पाटील,गट विकास अधिकारी,कणकवली अरुण चव्हाण,जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी प्रविण ओहोळ,पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे,पोलीस निरीक्षक (नाहसं) ज्योती चव्हाण,समितीचे सदस्य सचिव तथा सहाय्यक आयुक्त तुषार गवळी तसेच संबंधित शाखेचे संतोष परुळेकर,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. समितीचे सदस्य सचिव तथा सहाय्यक आयुक्त तुषार गवळी यांनी पोलीस तपासावर प्रलंबित असलेली प्रकरणे,मागील बैठकीचे इतिवृत्त तसेच अत्याचारपीडितांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याबाबतचा आढावा समितीसमोर सादर केला. अध्यक्ष शारदा पोवार यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत दाखल प्रकरणांमध्ये पोलीस विभागाकडून दोषारोपपत्र विहित मुदतीत सादर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी पीडित व्यक्तीचे जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. बैठकीत पोलीस विभागाकडील दाखल प्रकरणे,प्रलंबित प्रकरणे व त्यांची सद्यस्थिती,समाज कल्याण विभागाकडे प्राप्त प्रकरणे तसेच अत्याचारपीडितांना देण्यात येणारी नुकसानभरपाई याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. अत्याचारपीडितांना नियमानुसार तात्काळ नुकसानभरपाई  देण्याबाबत सूचना दिल्या.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026