शासकीय आश्रम शाळा मोरोशी येथे रुपाली चाकणकर यांची भेट
शासकीय आश्रम शाळा मोरोशी येथे 25 डिसेंबर रोजी आश्रम शाळा मोरोशी येथे इयत्ता 10 वी च्या वर्गात शिकत असलेली विद्यार्थिनी कोमल भास्कर भला या विध्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती, त्यामध्ये तेथील मुख्याध्यापक प्रल्हाद भोई व महिला अध्यक्षिका जयश्री वाघाडे यांना निलंबित करून त्याच्यावर गुन्हे दाखल केले असून,कोमल भास्कर भला हिच्या आत्महत्येच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 2 जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शासकीय आश्रम शाळा मोरोशी येथे भेट देऊन मुलीच्या वडिलांना आश्वासन दिले कि या प्रकरणाची कसून चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात येईल,आता पर्यंत मुख्याध्यापक व महिला अध्यक्षिका यांना निलंबित केले आहे आणि जो पर्यंत संपूर्ण तपास करून अजून जेवढे दोषी आढळतील त्या संबंधितानवर कारवाई करू असे सांगण्यात आले. यावेळी राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर तसेच त्यांचे प्रशकीय तपास अधिकारी व त्यांची टीम तसेच पेन प्रकल्प अधिकारी गलांडे मॅडम, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे कोकण महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रविंद्र मराडे,शहापूर प्रकल्प अधिकारी कालपांडे सर, भोरांडे ग्रामपंचायत सरपंच वैभव सरोगदे,माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल घरत,नंदा उघडा,गोविंद भला,योगेश गांगड,वामन खाकर,दीपक कोकणे तसेच मोटोशी ग्रामस्थ मोठया प्रमाणात उपस्थित होते.
प्रतिनिधी- किरण कारभळ - टोकावडे