लेखिका मिना म्हसे यांच्या हस्ते सचिन बेंडभर यांचा सन्मान
"बचत" या कथेची हवेली तालुक्यात विशेष दखल
शिरूर:- प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर यांच्या चौथीच्या पाठ्युस्तकात बचत या कथेची निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान हवेली तालुक्यातील "निरागस मने " या पुस्तकाच्या लेखिका मिना म्हसे यांच्या हस्ते करण्यात आला. म्हसे यांनी गृहभेट देऊन सहपरिवार सन्मान केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यावर्षी चौथीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आलेला आहे. नवीन छपाई करण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकात यावर्षी प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर यांच्या बचत या कथेचा समावेश करण्यात आला आहे. या गोष्टीची दखल घेत हवेली तालुक्यातील "निरागस मने" या पुस्तकाच्या लेखिका मिना म्हसे यांनी सहपरिवार बेंडभर यांच्या राहत्या घरी विशेष सन्मान केला. आपल्या माणसांच्या हस्ते व आपल्या भूमीच झालेला सन्मान हा विशेष आनंददायी असतो. या सन्मानाने साहित्य लेखनास निश्चितच नवी ऊर्जा मिळाली. साहित्य क्षेत्रात वीस वर्षे काम करत असताना आज खऱ्या अर्थाने या कामाचे चीज झाल्यासारखे वाटले. आज माझा जो सन्मान केला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद असे महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर पाटील यांनी"टिटवाळा" न्यूज ला सांगितले.