• Total Visitor ( 481999 )
News photo

अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना फासलं काळं 

Raju tapal July 14, 2025 73

अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना फासलं काळं 



सोलापूर :- संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात आलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे त्यांना काळं फासण्यात आलं. यावेळी त्यांच्या अंगावर काळी शाई टाकण्यात आली. प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी  शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांनी काळं फासल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.



प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रमक झाले होते. त्यांनी याबाबत नाराजी ही व्यक्त केली होती. त्याचबरोबर स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचा देखील राग पदाधिकाऱ्यांच्या मनात होता. त्यामुळे त्यांनी गायकवाड हे शहरात आल्यानंतर त्यांच्यावर काळे टाकण्यात आले.  यापूर्वी शिवधर्म फाउंडेशनने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात उपोषण देखील केले होते. 



प्रवीण गायकवाड यांना हलगीच्या कडकडाटात स्वागत करून संयोजक कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन जात असताना शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांना वाटेतच अडवून त्यांच्या अंगावर काळी शाई ओतली. तसेच त्यांच्या तोंडाला सुद्धा काळे फासले. प्रवीण गायकवाड यांच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तर धर्मविर संभाजी महाराज आणि श्री स्वामी समर्थांचा जयजयकार करून पदाधिकारी आणि कार्यकर्ते निघून गेले. प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासण्यात आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement