• Total Visitor ( 553171 )
News photo

संजय पाचंगे‌ यांचे आंदोलन स्थगित        

Raju tapal November 05, 2025 87

संजय पाचंगे‌ यांचे आंदोलन स्थगित 





शिक्रापूर (प्रतिनिधी ):- शिक्रापूर-चाकण रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आल्याने संजय पाचंगे यांनी त्यांचे आंदोलन स्थगित केले आहे. चाकण ते शिक्रापूर व कोरेगाव भीमा ते शिरूर या भागात  महामार्गावरील मोठमोठे खड्डे,सरफेस खरबडीत‌ असणे साईड पट्ट्या नादुरूस्त,अरूंद रस्ते यामुळे सदर महामार्ग वाहने चालविण्यासाठी धोकादायक होवून भयंकर अपघात होवून अनेकांना प्राण गमवावे लागले यासाठी संजय पाचंगे‌ त्यांच्या सहका-यांसह दि.०४/११/२०२५ पासून शिक्रापूर-चाकण,शिक्रापूर-शिरूर रोडवरील खड्ड्यात उपोषण आंदोलन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. संजय पाचंगे‌ यांच्या आंदोलनाबाबत "टिटवाळा न्यूज"ने बातमी प्रसिद्ध केली होती. शिक्रापूर -चाकण रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आल्याने पाचंगे यांनी त्यांचे आंदोलन स्थगित केले आहे. 

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement