निमगाव म्हाळुंगी गावचे सरपंच बापुसाहेब काळे यांचा लोकमतच्या वतीने सन्मान
मला माझ्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देणारा हा पुरस्कार; बापूसाहेब काळे यांची प्रतिक्रिया
शिक्रापूर ( प्रतिनिधी) :- उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील १३ विविध कॅटॅगिरीतील सरपंचांचा 'दैनिक लोकमत'च्या वतीने सन्मान करण्यात आला.यामध्ये शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी गावचे विद्यमान सरपंच बापूसाहेब काळे यांचा समावेश आहे.
क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार राहूल कुल, कृषी संचालक विनयकुमार आवटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे,बी के टी मार्केटिंगचे विकास नैथानी, केयश बांगा, मलाबार लक्ष्मी,दिक्षा देसाई,सुशील जाधव, प्रशांत पल्लेवार, लोकमतचे संपादक संजय आवटे,विशाल तांबे, विराज काकडे, डाॅ.सुवर्णा पाटील, अॅड.सादिक लूकडे, सचिन इटकर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
मुळशी तालुक्यातील घोटावडे येथील वैशाली संदीप कुंभार या पुणे जिल्ह्यातील 'सरपंच आॅफ द इयर च्या मानकरी ठरल्या असून जलव्यवस्थापन मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या खोर तालुक्यातील दौंड येथील ज्ञानेश्वर तुकाराम चौधरी,वीज व्यवस्थापनमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या टेकवडी,आंबोली ता.खेड येथील सरपंच विठ्ठल शिंदे, शैक्षणिक सुविधा मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वराळे ता.खेड येथील सरपंच पुजा विश्वास बुट्टे पाटील,स्वच्छतेमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पेठ ता.हवेली येथील सरपंच मोनिका श्रीकांत चौधरी,आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल निमगाव म्हाळुंगी येथील सरपंच बापूसाहेब काळे, पायाभूत सेवेमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल वरूडे ता.शिरूर येथील सरपंच कानिफनाथ भरणे,ग्रामरक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल भालगुडी ता.मुळशी येथील सरपंच संतोष साठे,पर्यावरण संवर्धन क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कडबनवाडी ता.इंदापूर येथील सरपंच दादासाहेब भानुदास जाधव, रोजगार निर्मिती क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल विंझर ता.वेल्हा येथील सरपंच मोनाली सतिश निम्हण,कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल बोरघर ता.आंबेगाव येथील सरपंच विजय जंगले, उदयोन्मुख म्हणून क-हाटी ता.बारामती येथील सरपंच दिपाली लोणकर,प्रशासन -ई-प्रशासन लोकसहभागात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल येणेरे ता.जुन्नर येथील सरपंच अमोल चंद्रकांत भुजबळ, माले ता.मुळशी येथील सरपंच सुहास शेंडे यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून नीरा ता.पुरंदर येथील सरपंच तेजश्री काकडे यांना संतूर विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
दैनिक लोकमतने सन्मान केल्याबद्दल "टिटवाळा न्यूज" ला प्रतिक्रिया देताना निमगाव म्हाळुंगी गावचे विद्यमान सरपंच बापूसाहेब काळे यांनी सांगितले, लोकमत वृत्तपत्र समुहाने लोकमत पुरस्कार २०२५ साठी माझी निवड करून मला योग्य न्याय दिला.लोकमत वृत्तपत्र समुहाने माझा केलेला सन्मान मला पुढच्या वाटचालीसाठी प्रेरणा देणारा पुरस्कार असेल.माझा सन्मान लोकमत वृत्तपत्र समुहाने केल्याने माझी समाजामध्ये अधिक गतीने काम करण्याची जबाबदारी निश्चितपणे वाढली आहे.मला मिळालेला पुरस्कार,केलेला सन्मान हा माझा वैयक्तिक नसून मला सहकार्य करणा-या,माझ्यावर प्रेम करणा-या माझ्या लहान मोठ्या ग्रामस्थांचा आहे.हा पुरस्कार माझ्या आई वडिलांना, मित्रपरिवाराला आणि ग्रामस्थांना समर्पित करत आहे.
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे (कोंढापुरी ता.शिरूर जि.पुणे)