शाळा स्तरावर शाळा प्रवेशोत्सव साजरा होणार
अमरावती जिल्हातील १०० शाळेला पदाधिकारी,अधिकारी यांची भेट
शाळेतील विद्यार्थांना पहील्या दिवशी पाठ्यपुस्तके,शालेय गणवेश व बुट,मोजे मिळणार
अमरावती :- बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ नुसार प्रत्येक बालकाचे नाव पटावर नोंदले जाणे आवशयक आहे. तसेच पटावर नोंदवलेला प्रत्येक बालक दररोज शाळेत उपस्थित राहून त्यास गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा हक्क कायद्याने मान्य केला आहे. शाळा बालकांचे भावविश्व घडविते. सामाजिक विकासात आणि राष्ट्राच्या जडणघडणीत शाळेचे स्थान महत्वाचे आहे. दीर्घ सुट्यांचा आनंद उपभोगुन शाळेत येणाऱ्या बालकांना शाळा हवीहवीशी वाटावी, याकरिता बालकांना हसत खेळत शिक्षण देण्याच्या उद्देशाने शाळा स्तरावर शाळा प्रवेशोत्सव साजरा करणे गरजेचे आहे. शाळा प्रवेशोत्सव २३ जूनला साजरा करण्यासाठी विविध उपक्रम शाळेत राबविण्यात यावे असे आदेश जिल्हा परीषद शिक्षण विभागाने शाळांना दिले आहे.शाळेच्या पहील्या दिवशी १००शाळांना जिल्हातील,खासदार,आमदार,जिल्हाधिकारी,जि.प.अधिकारी व शिक्षण विभागाचे अधिकारी,डायटचे प्राचार्य,सरपंच,शाळा व्यवस्थापण समिती पदाधिकारी यांच्या भेटीत शाळा प्रवेशोत्सव साजरा होणार आहे.
शाळा शुभारंभाचे नियोजन
२१ जून २०२५शाळेच्या परिसराची स्वच्छता आणि सुशोभीकरण करणे. वर्ग खोलींची किरकोळ दुरुस्ती करून वर्ग खोलीची स्वच्छता करून घेणे. अध्ययन अध्यापन साहित्य वर्गनिहाय वर्गात लावणे. शालेय पोषण आहार अंतर्गत धान्य व धान्यादी मालाची स्वच्छता करून घेणे. पिण्याच्या पाण्याची टाकी निर्जंतुक करून घेणे. स्वच्छता गृहाची स्वच्छता करून पाण्याची सुविधा करणे. वृक्षारोपणाची तयारी करून घेणे.सकाळी योग दिन साजरा करणे.
२२ जून २०२५ शासन निर्णय शा.नि. क्र. ११२५ प्र.क्र. २५१ दि.१६/४/२५ नुसार नमूद केलेल्या चार समितीची सभा घेवून सभेचे इतिवृत्त ठेवणे. गावातील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी यांना प्रवेशोत्सवसाठी आवाहन करणे. फलक सुशोभित करून घेणे. सर्व लेखे अद्यावत करणे. (विद्यार्थी हजेरी, घटक नियोजन, मासिक नियोजन, वार्षिक नियोजन, शालेय पोषण अंतर्गत नोंद वही, इ.) दिनांक २२ जून २०२५ शाळेतील सर्व शिक्षकांची सभा काम वाटपाचे नियोजन करणे. 100 टक्के प्रवेश पात्र विद्यार्थीचे प्रवेश आवेदन पत्र भरून प्रवेशाची कार्यवाही करून घेणे. नवगतांच्या स्वागताची पूर्वतयारी करणे. शाळेत नवीन प्रवेशित होणाऱ्या बालकांच्या घरी भेटी देणे. २३ जून २०२५ नवीन प्रवेशित बालकांचे औक्षवण करणे. व बालकांचे पुष्पगुष्य देवून स्वागत करणे. विद्यार्थीची प्रभातफेरी काढणे. (बैलगाडी / ट्रॅक्टर, आदि साधनाचा वापर करु नये)
मोफत पाठ्यपुस्तक व शालेय गणवेशाचे वितरण करणे. शालेय पोषण आहारामध्ये गोड पदार्थाचे वाटप करणे. शाळा प्रवेशाचा अहवाल त्याच दिवशी सादर करणे.या प्रमाणे शाळा प्रवेशोत्सव दिवशी आपल्या अधिनस्त सर्व शाळांना कार्यवाही करण्याबाबत आदेशित करावे.असे आदेश गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहे.
====================