शाळा व्यवस्थापन समिती सभा व पालक सभा संपन्न
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उत्तमसरा येथे आयोजन
अमरावती/भातकुली-पंचायत समिती भातकुली अंतर्गत केंद्र गणोरी मधिल जिल्हा परिषद शाळा उत्तमसरा येथे मंगळवार २डिसेंबरला शाळा व्यवस्थापन समितीची सभा व पालक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रत्नदिप सवाई होते तर प्रमुख अतिथी सरपंच धमेंद्र मेहरे,उपाध्यक्ष प्रिया मानकर,सदस्य बंडू थोटे,वनिता जोगी,अनुराधा भिंगारे,मुख्याध्यापिका मिनाक्षी इंगळे,स.शि.राजेश सावरकर,गजानन येलोने,प्रमोद कांबळे उपस्थित होते.क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून,उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून सभेला सुरूवात करण्यात आली. यावेळी प्रास्तविक मधुन शाळेच्या मुख्याध्यापिका मिनाक्षी इंगळे यांनी विद्यार्थी सुरक्षा बाबतच्या करावयाच्या उपाय योजना आणि पालकामध्ये जनजागृती बाबत माहीती दिली.महीला तक्रार निवारण,सखी साविञी समिती,तक्रार पेटी,शालेय पोषण आहार,फाॅलिक अॅसिड गोळ्या,परसबाग,अॅनिमिया मुक्त शाळा,वर्ग ४था व ५वा स्काॅलरशिप परीक्षा आणि नवोदय परीक्षा पूर्व तयारी,माजी विदयार्थी संघ स्थापन करणे व मेळावाचे आयोजन करणे.आनंदायी शनिवार,आकारीत व संकलीत पेपर व निकाल यात विद्यार्थी प्रगती,शालेय शिस्त व गणवेश,वैयक्तीक स्वच्छता आणि आरोग्य,विद्यार्थांच्या कला गुणांना वाव,हस्ताक्षर स्पर्धा,चिञकला स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,कथाकथन स्पर्धा,नृत्य स्पर्धा,निपून कार्यक्रम/उत्सव,विविध शिष्यवृत्ती,खाॅन अकाॅडमी अश्या विविध विषयाची माहीती त्यांनी दिली. या सभेचे सुञसंचालन गजानन येलोने यांनी तर आभार प्रदर्शन राजेश सावरकर यांनी मानले.सभेला श्रीकृष्ण मुदांने,कैलास रंगारी,सविता जुनघरे,अलका मानकर,रूपाली मालधुरे,मेघा मालधुरे,ज्योती रगडे,छाया पिंगे,आश्विनी पवार,रोश्वर्या ठाकुर,रोहीनी सवाई,माधुरी सवाई,अर्पना झाडे,संगीता कुरवाडे उपस्थित होते.