• Total Visitor ( 702028 )
News photo

कोकडेवाडी येथील शेततळ्यात बुडून शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू 

Raju tapal March 09, 2026 64

कोकडेवाडी येथील शेततळ्यात बुडून शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू 

     

शिक्रापूर :- शिरूर तालुक्यातील कोकडेवाडी येथील शेततळ्यात बुडून शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दि.७ मार्चला सायंकाळी घडली. सात्विक अण्णासाहेब कोकडे‌ वय -१० वर्षे असे शेततळ्यात बुडून दूर्दैवी मृत्यू झालेल्या शाळकरी विद्यार्थ्याचे नाव आहे. सात्विकचे आई -वडील कामानिमित्त बाहेरगावी गेले होते.अर्ध्या दिवसाची शाळा शनिवारी सुटल्यानंतर सात्विक कोकडेवाडीतील घरी आला.दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास तो घराबाहेर खेळण्यासाठी गेला.सायंकाळपर्यंत तो घरी न आल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला.शोध घेत असताना काही अंतरावर असलेल्या शेततळ्यात सात्विकता मृतदेह तरंगताना आढळून आला.नातेवाईकांनी त्याला तातडीने न्हावरे‌ ग्रामीण रूग्णालयात नेले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करून त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. सात्विक हा न्हावरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौथी इयत्तेत शिकत होता.सात्विकच्या पश्चात आई -वडील,एक लहान भाऊ असा परिवार असून शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दूर्दैवी घटनेमुळे कोकडेवाडी तसेच न्हावरे‌ परिसरात अनेकांनी  हळहळ व्यक्त केली.

      


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026