• Total Visitor ( 453514 )
News photo

शिरूर तालुक्यातील भाजपचे जेष्ठ नेते प्रतापराव उर्फ बाळासाहेब चव्हाण यांचे निधन 

Raju Tapal publisher March 27, 2026 25

शिरूर तालुक्यातील भाजपचे जेष्ठ नेते प्रतापराव उर्फ बाळासाहेब चव्हाण यांचे निधन 

    

शिक्रापूर :-शिरूर तालुक्यातील भाजपचे जेष्ठ नेते प्रतापराव उर्फ बाळासाहेब दत्तात्रय चव्हाण यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी १८ मार्चला निधन झाले. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक,शिक्रापूर ग्रामपंचायतीचे सदस्य शिक्रापूर गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष,शिरूर तालुका आरोग्य समितीचे अध्यक्ष अशी पदे चव्हाण यांनी भूषविली. त्यांनी सलग १३ वर्षे पंढरपूर पायी दिंडी केली.आळंदी,पंढरीचा वारकरी अशी त्यांची ओळख होती.वारकरी सांप्रदायाशी त्यांचे घट्ट नाते होते. अनेक युवकांना मार्गदर्शन करण्याचे कार्य त्यांनी केले. शिरूर तालुक्याचे भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार स्वर्गीय बाबूराव पाचर्णे यांचे ते निकटवर्तीय,अत्यंत विश्वासू सहकारी समजले जात होते. २७ मार्चला शिक्रापूर येथील वेळ नदीकाठी दशक्रिया विधी चे आयोजन करण्यात आले असून ह.भ.प. गणेश महाराज शिंदे यांच्या प्रवचनाचे आयोजन चव्हाण परिवाराने केले आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement